वंदे भारत Vs चित्ता! शर्यतीत कोण जिंकणार? सत्य जाणून व्हाल चकित

तुम्ही कधी कल्पना केलीय का, वंदे भारत ट्रेन आणि चित्ता यांमध्ये शर्यत लावल्यास कोण जिंकेल? चला जाणून घेऊया.
वंदे भारत Vs  चित्ता! शर्यतीत कोण जिंकणार? सत्य जाणून व्हाल चकित

मुंबई: वंदे भारत एक्सप्रेस देशातील लोकप्रिय ट्रेन आहे. आंतरराष्ट्रीय मानकांवर आधारित अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि उच्च गती असलेल्या वंदे भारत एक्सप्रेस भारतीय रेल्वेनं सुरु केल्या आहेत. सध्या काही कारणांमुळं वंदे भारत एक्सप्रेस तिच्या कमाल वेगानं धावत नाही. सुरक्षेच्या कारणास्तव रेल्वेनं या ट्रेनसाठीही वेगमर्यादा निश्चित केली आहे. पण तुम्ही कधी कल्पना केलीय का, वंदे भारत ट्रेन आणि चित्ता यांमध्ये शर्यत लावल्यास कोण जिंकेल?

परदेशातील अत्याधुनिक ट्रेनला टक्कर देण्यासाठी वंदे भारत ट्रेन भारतात सुरू करण्यात आली. सध्या देशातील विविध मार्गांवर वंदे भारत ट्रेन धावत आहेत. याशिवाय वंदे भारत मेट्रोची चाचणीही सुरु आहे. तसेच येत्या काही वर्षांत मुंबई-अहमदाबाद मार्गावर हायस्पीड बुलेट ट्रेन सुरू होणार आहे. सेमी-हायस्पीड ट्रेन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांचे सर्वच मार्गावर कौतुक होत आहे. मात्र या गाड्या अपेक्षेइतक्या वेगाने धावत नसल्याचे काही प्रवाशांचं मत आहे. काही तांत्रिक समस्यांमुळं भारतीय रेल्वेनं या गाड्यांचा वेग मर्यादित केला आहे.

वंदे भारत ट्रेन Vs बिबट्या यांच्या शर्यतीमध्ये कोण जिंकणार?

बिबट्या जगातील वेगवान प्राण्यांपैकी एक आहे. बिबट्या ताशी १३० किमी वेगाने धावू शकतो. पण ही ट्रेन त्याहूनही वेगाने धावते. वंदे भारत ट्रेन ताशी 180 किमी वेगाने धावू शकतात. त्यांना तशा पद्धतीनं डिझाइन करण्यात आलं आहे. अशा परिस्थितीत चित्ता आणि वंदे भारत ट्रेनमध्ये स्पर्धा झाली तर वंदे भारत ट्रेन जिंकेल.

वंदे भारत एक्सप्रेसची वैशिष्ट्ये:

वंदे भारत गाड्या पूर्णपणे अत्याधुनिक वैशिष्ट्यांसह डिझाइन केल्या आहेत. त्यात स्वयंचलित दरवाजे, बायो-टॉयलेट, वृद्धांसाठी विशेष आसनं आदी सुविधा आहेत. तुम्ही ट्रेनमध्ये असता तेव्हा ट्रेनचा वेग किती आहे, हे आपल्याला निश्चितपणे लक्षात येत नाही. अतिवेगाने जात असताना ट्रेन हलू नये यासाठी यात वंदे भारत ट्रेनमध्ये खास सस्पेंशन सिस्टीम आहे.

वंदे भारत ट्रेन वेगाने धावत नाही, असे अनेकदा लोकांना वाटते. पण प्रत्यक्षात ही ट्रेन ताशी 180 किमी वेगाने धावण्यासाठी तयार करण्यात आली होती, परंतु सुरक्षेच्या कारणास्तव ती ताशी 160 किमीपर्यंत मर्यादित होते. पण काही ठिकाणी ही ट्रेन ताशी 150 किमी वेगाने धावतात. यामागचे एक प्रमुख कारण म्हणजे या वेगासाठी योग्य असे मजबूत रेल्वे ट्रॅक देशात सर्वत्र उपलब्ध नाहीत. त्यामुळे जिथे ट्रॅक मजबूत नाहीत, तिथे वंदे भारत ट्रेन कमी वेगाने धावते.

logo
marathi.freepressjournal.in