

रीटा पालांडे
उन्हाळा सुरु होताच मातीचा माठ हा घराघरातला भाग होतो. नैसर्गिकरित्या थंड पाणी देणारा हा माठ केवळ शरीराला शीतलता देत नाही, तर वास्तूशास्त्राच्या दृष्टिकोनातूनही त्याचा घरात विशेष प्रभाव असतो.
उन्हाळ्याच्या दिवसात माठातील थंड पाणी शरीरासाठी फायदेशीर तर आहेच, पण माठ योग्य ठिकाणी ठेवल्यास घरात सौख्य, शांती आणि समृद्धी देखील येते. मात्र हा माठ जर चुकीच्या दिशेला ठेवला, तर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते, मानसिक अस्वस्थता जाणवू शकते, आणि कधी कधी आर्थिक अडचणीही जाणवू शकतात, असं वास्तुशास्त्र सांगतं. चला तर पाहुयात पाण्याचा माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती?
वास्तूशास्त्रानुसार, मातीचा माठ भरण्यासाठी उत्तर-पूर्व किंवा उत्तर दिशा चांगली मानली जाते. याचं कारण म्हणजे ही दिशा जलदेवता वरुण देवाची आहे. त्याचबरोबर उत्तर-पूर्व किंवा उत्तर दिशेला माठ ठेवल्याने देवी लक्ष्मीची कृपा राहते आणि घरात सुख-समृद्धी निर्माण होते. वास्तूशास्त्रानुसार, यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. वास्तूशास्त्रानुसार, घरात मातीचा माठ कधीच रिकामा ठेवू नये. असं करणं अशुभ मानलं जातं. त्यामुळे माठात नेहमी पाणी भरुन ठेवा. पाण्याचा माठ रिकामा ठेवल्यास घरात दारिद्र्य येते. त्याचबरोबर, पाण्याचा माठ नेहमी स्वच्छ राहील या गोष्टीकडे सुद्धा लक्ष द्या. तसेच, अशुद्ध ठिकाणी जसे की, शौचालयाच्या जागी, बूटांच्या जागी पाण्याचा माठ ठेवू नका. यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
बघा व्हिडिओ-