'या' शाकाहारी पदार्थांमध्येदेखील असते भरपूर प्रोटीन

शाकाहारी पदार्थांमध्येदेखील प्रोटीनची पर्याप्त मात्रा असतेे आणि सर्वांना त्याचे लाभ घेणं शक्य आहे. जाणून घेऊ या स्त्रोतांविषयी.
'या' शाकाहारी पदार्थांमध्येदेखील असते भरपूर प्रोटीन

आरोग्य चांगले राखण्यासाठी डाएटमध्ये प्रोटीनचा समावेश करून घेणे अत्यंत गरजेचे आहे. प्रोटीन हे आपल्या शरीरासाठी आवश्यक असून शरीरातील नसा मजूबत करण्यास मदत करतात. तसंच फिटनेस व्यवस्थित राखून आणि मसल्स बनविण्यासाठीही प्रोटीनचा फायदा होतो. डाएट फॉलो करणाऱ्या अथवा जीम करणाऱ्या महिलांच्या आहारामध्ये प्रोटीन असणं गरजेचं ठरतं. खरं पाहता मांसाहारी पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रोटीनचा स्त्रोत असतो. असं असेल तर शाकाहारी प्रोटीनच्या लाभापासून वंचित राहतात का, असा प्रश्न पडतो. पण शाकाहारींनी चिंता करण्याचं कारण नाही. कारण शाकाहारी पदार्थांमध्येदेखील प्रोटीनची पर्याप्त मात्रा असतेे आणि सर्वांना त्याचे लाभ घेणं शक्य आहे. जाणून घेऊ या स्त्रोतांविषयी...

प्रोटीन सप्लीमेंट्स : प्रोटीन सप्लीमेंट्सचा उपयोग केवळ जीमला जाणाऱ्या महिलांपुरताच मर्यादित राहतोे. पण सर्वांनीच त्याचा लाभ घ्यायला हवा. कारण यामध्ये प्रोटीन्सचा सर्वोत्तम स्त्रोत असतो. हल्ली बाजारात वेगवेगळ्या प्रकारची प्रोटीन सप्लीमेंट्स मिळतात. साधारणत: तीस ग्रॅम पावडरपासून २२-३० ग्रॅम प्रोटीन मिळतं.

मोड आलेले सोयाबीन : मोड आलेले सोयाबीन हा प्रोटीनचा सर्वोत्तम स्त्रोत आहे. १०० ग्रॅम सोयाबीनमध्ये ५२ ग्रॅम प्रोटीन आणि ३३ ग्रॅम कार्बोहायड्रेड असतं. तुम्ही हे कडधान्य वाफवून खाऊ शकता.

शेंगदाणे : शेंगदाणेदेखील प्रोटीनचा उत्तम स्त्रोत आहेत. १०० ग्रॅम शेंगदाण्यांमध्ये २६ ग्रॅम प्रोटीन असतं. पण यात ५० ग्रॅम फॅट असल्याने डाएट करणार्‍यांनी काळजी घ्यायला हवी.

पनीर : हा सगळ्याचा आवडता घटक असला तरी सावधान! पनीरमध्ये २३ ग्रॅम प्रोटीन असलं तरी २७ ग्रॅम फॅटही असतं.

भाज्या : भाज्यांमध्येही अधिक प्रमाणात प्रोटीन असते. पालक, बटाटा, ब्रोकोली, रताळे, हिरवा वाटाणा अशा अनेक भाज्यांमधून प्रोटीन मिळवता येते. तुम्हाला तुमच्या डाएटमध्ये प्रोटीनचा समावेश करून घ्यायचा असेल तर तुम्ही या भाज्यांचा नक्की समावेश करून घ्या.

Note : या लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक आहे. ही माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही. याचे व्यक्तिनुसार भिन्न परिणामही होऊ शकतात. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टरांकडून खात्री करून घ्यावी.

logo
marathi.freepressjournal.in