Viral Jokes In Marathi: माणसाने नेहमी हसत राहिले पाहिजे असं म्हंटलं जातं. कारण हे एक स्वस्त औषध आहे. तुम्हाला हेल्दी राहायचं असेल तर हसणं फार गरजेचं आहे. आजकालची लाइफस्टाईल ही फारच तणावपूर्ण आहे. अशा लाईफस्टाईलमध्ये हसणे फार फायदेशीर गरजेचे आहे. तुमचा ताण कमी करण्यासाठी तर हा एक अतिशय प्रभावी उपाय आहे. हे तणावाच्या अनेक रोग-उद्भवणाऱ्या परिणामांवर नैसर्गिक सोल्युशन म्हणून काम करते. हसण्याचे अगणित फायदे आहेत. हसण्यामुळे नैराश्य, चिंता आणि तणावाची पातळी कमी होते. हसण्याने आपला दैनंदिन भार हलका होण्यास मदत होते. यामुळेच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो मजेदार जोक्स.
हे ही वाचा
तो बाहेरून प्रथमच मुंबईत आला असावा कारण तो विचारु लागला
"मुलुंड कधी येईल मला उत्तरायचंय." लोकांनी सांगितलं की "ही फास्ट गाडी आहे ही मुलुंडला थांबत नाही".
बिचारा घाबरला. लोकांनी सांगितलं की "घाबरू नको एक कर, ही गाडी मुलुंडला स्लो होते तेंव्हा तू धावत्या गाडीतून उतार. व गाडी ज्या दिशेला जाते त्या दिशेला थोडा धाव म्हणजे तू पडणार नाहीस".
झालं, ठरल्या प्रमाणे त्याला दारात उभं केलं, गाडी मुलुंड ला स्लो झाली तेंव्हा तो स्टेशन वर उतरला आणि ठरल्याप्रमाणे धावला, पण तो इतका जोरात धावला की पुढच्या डब्याजवळ गेला.तिथल्या लोकांनी त्याला धरून आत घेतला व सांगितलं,
"तुझं नशीब चांगलं म्हणून तुला ही गाडी मिळाली, ही फास्ट ट्रेन आहे. मुलुंडला थांबत नाही."
हे ही वाचा
जोक स्त्रोत - सोशल मीडिया
(Disclaimer: या लेखात देण्यात आलेलं विनोद हे मनोरंजनासाठी आहेत. यातून कोणाच्याही भावना दुखावण्याचा 'नवशक्ति'चा हेतू नाही.)