Joke of The Day: एकदा ऐका गावात तलाठ्याच्या मागं कुत्रा लागतो

Latest Marathi Joke: तुमचा ताण कमी करण्यासाठी तर हसणे एक अतिशय प्रभावी उपाय आहे. याचसाठी आम्ही तुमच्यासाठी खास जोक घेऊन आलो आहोत.
joke of the day
Freepik

Viral Jokes In Marathi: माणसाने नेहमी हसत राहिले पाहिजे असं म्हंटलं जातं. कारण हे एक स्वस्त औषध आहे. तुम्हाला हेल्दी राहायचं असेल तर हसणं फार गरजेचं आहे. आजकालची लाइफस्टाईल ही फारच तणावपूर्ण आहे. अशा लाईफस्टाईलमध्ये हसणे फार फायदेशीर गरजेचे आहे. तुमचा ताण कमी करण्यासाठी तर हा एक अतिशय प्रभावी उपाय आहे. हे तणावाच्या अनेक रोग-उद्भवणाऱ्या परिणामांवर नैसर्गिक सोल्युशन म्हणून काम करते. हसण्याचे अगणित फायदे आहेत. हसण्यामुळे नैराश्य, चिंता आणि तणावाची पातळी कमी होते. हसण्याने आपला दैनंदिन भार हलका होण्यास मदत होते. यामुळेच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो मजेदार जोक्स.

> माझ्या फार्मवर लावणीचा कार्यक्रम आयोजित केल्याचे कळल्यावर लांबून लांबून बरेच मित्र गाडया करून आले…. त्यांच्याकडून व्यवस्थित भात-लावणी करुन घेतली. सगळे मला जाताना शिव्या देऊन गेले. माझं काय चुकलं ??

> एकदा ऐका गावात तलाठ्याच्या मागं कुत्रा लागतो…..
.
.
तलाठी सगळ्या गावातनं पळून आल्यावर एका झाडावर चढतो आणि .
.
.
कुत्र्याला म्हणतो साल्या तुझ्याकडे गुंठाभर जरी जमिन असती ना….?????
तर तुला समजलं असतं कुणाशी पंगा
घेतला ते…

जोक स्त्रोत - सोशल मीडिया

(Disclaimer: या लेखात देण्यात आलेलं विनोद हे मनोरंजनासाठी आहेत. यातून कोणाच्याही भावना दुखावण्याचा 'नवशक्ति'चा हेतू नाही.)

logo
marathi.freepressjournal.in