उन्हात फिरल्याने केसांचा रंग होऊ शकतो पांढरा; 'अशी' घ्या काळजी

उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कडक ऊन, घाम, धूळ यामुळे केसांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो. केसांमध्ये अतिरिक्त मळ साचल्यामुळे ओला कोंडा होण्याची शक्यता वाढते. तसेच उन्हामुळे केसांच्या रंगावर परिणाम होऊ शकतो.
hair care tips
प्रातिनिधिक छायाचित्रFreepik
Published on

उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कडक ऊन, घाम, धूळ यामुळे केसांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो. केसांमध्ये अतिरिक्त मळ साचल्यामुळे ओला कोंडा होण्याची शक्यता वाढते. तसेच उन्हामुळे केसांच्या रंगावर परिणाम होऊ शकतो. विशेषतः तुम्ही जर हेअर कलर केला असेल तर त्याचा रंग बदलू शकतो. तसेच केसांचा नैसर्गिक रंग देखील फिका होऊ शकतो किंवा उन्हामुळे केस पांढरे पडू शकतात. यासाठी केसांची खास काळजी घेणे आवश्यक आहे. जाणून घ्या केसांची काळजी कशी घ्यावी...

आठवड्यातून किमान तीन वेळ केस धुणे

उन्हाळ्यात आठवड्यातून तीन वेळा केस धुवायला हवे. यामुळे केस चिकट आणि खराब होत नाही. तसेच केसांमध्ये ओला कोंडा होण्याची शक्यता कमी होते.

केसांना वाफ देणे

केसांना आठवड्यातून किमान एकदा वाफ द्या. यामुळे केसांची छिद्र स्वच्छ होतील. केसांना वाफ दिल्याने केस मजबूत होतात. तसेच नवीन केस येण्याचे प्रमाण वाढते.

हेअर पॅक लावणे

बाजारात अनेक प्रकारचे हेअर पॅक उपलब्ध असतात. तुम्हाला जो सूट करत असेल तो पॅक लावावा अथवा घरच्या घरी हेअर पॅक बनवता येतो.

मेहंदी लावणे

केसांना उन्हाळ्यात विशेष कंडीशनर करणे आवश्यक असते. मात्र, पार्लरमधील थेरपींसाठी खूप पैसे खर्च होतात. यासाठी मेहंदीचा उपयोग उत्तम ठरेल. मेहंदी ही नैसर्गिक कंडीशनर आहे. यामुळे केसांना कंडिशनिंग तर मिळतेच मिळते. शिवाय तुमचा हेअर कलरही सुरक्षित राहतो.

याशिवाय उन्हामुळे केस पांढरे पडणार असतील तर मेहंदी त्यावर एक उत्तम औषध सिद्ध होऊ शकते. मेहंदी नैसर्गिकरित्या तुमच्या केसांचा मूळ रंग तसाच ठेवते.

मेहंदी जर लोखंडाच्या कढईत किंवा लोखंडाच्या काळ्या तव्यावर भिजायला टाकली तर अशी मेहंदी लावल्याने तुमचे केस लाल ऐवजी काळे होतील. हे केस अगदी नैसर्गिकरित्या काळे दिसतील.

आठवड्यातून एकदाच तेल लावा

उन्हाळ्याचे दिवस असल्याने केस कोरडे पडत नाहीत. त्यामुळे आठवड्यातून एकदाच तेल लावले तरी केसांची चांगली वाढ होऊ शकते.

logo
marathi.freepressjournal.in