
भात हा आहारातील मुख्य घटक आहे. भाताचे असंख्य पदार्थ आहेत. रोजच्या जेवणात किमान एकदा तरी भात खायला आवडतो. अनेक संशोधनांद्वारे भात खाल्ल्याने वजन वाढते, असे सांगितले जाते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी भात खाणे टाळले जाते. मात्र, ब्राऊन राइस याला अपवाद आहे. चला पाहूया ब्राऊन राइस नेमका कसा असतो काय आहेत त्याचे फायदे?
ब्राऊन राईस (तांदूळ) कसा असतो?
शेतात जेव्हा भात पिकतो. तेव्हा तांदळाच्या दाण्याला सालीची तीन आवरणे असतात. पांढरा तांदुळ हा वेगवेगळी प्रक्रिया करून रिफाईंड करून त्याचे हे तिन्ही आवरण काढून टाकण्यात येते. नंतर त्याला पॉलिश केले जाते. मात्र, ब्राऊन राइस हे अनरिफाईंड असते त्यामुळे यामध्ये तांदळाचे केवळ बाह्य आवरण जे जाडसर असते ते काढण्यात येते. तर अन्य दोन पातळ साली तशाच ठेवल्या जातात. त्यामुळे याचा रंग भूरकट होतो, म्हणून याला ब्राऊन राइस म्हणतात.
काय आहेत ब्राऊन राइसमधील घटक
ब्राऊन राइसमध्ये जीवनसत्त्वे बी३, बी१, बी६ भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे शरीरातील या जीवनसत्त्वांची कमतरता पूर्ण होते.
याशिवाय कर्बोदके, प्रथिने, फायबर, मॅग्नेशियम, फॉस्फोरस, लोह, फायबर, अँटी अॅसिड्स इत्यादी महत्त्वपूर्ण पोषक तत्वे असतात.
याऊलट रिफाईंड प्रक्रियेत तांदळातील हे आवश्यक घटक निघून जातात. परिणामी पांढऱ्या भातात याचे प्रमाण कमी असते.
ब्राऊन राइस रक्तातील घातक कोलेस्टेरोलचे प्रमाण कमी करते.
मधुमेह रुग्णांसाठी ब्राऊन राईस आहे उत्तम
ब्राऊन राइसमध्ये फायबर पांढऱ्या भाताच्या तुलनेने अधिक असते. त्यामुळे रक्तातील घातक कोलेस्टेरोलचे प्रमाण कमी होते. तसेच रक्तातील शुगर नियंत्रित होते.
पचनक्रिया सुधारते.
फायबरचे मुबलक प्रमाणामुळे ब्राऊन राइस थोडाच खाल्ला तरी पोट लगेच भरते. याशिवाय अन्न व्यवस्थित पचते. पचनक्रिया सुधारते. पचनक्रिया सुधारल्याने बद्धकोष्ठ किंवा पचनाशी निगडीत इतर समस्या दूर होतात.
कन्सरचा धोका कमी
ब्राऊन राइसमध्ये सेलेनियम आणि फेनोल्स असतात. त्यामुळे कोलोन कॅन्सरचा धोका कमी होतो. तसेच यामुळे थायरॉईडवरही नियंत्रण राखले जाते.
ब्राऊन राइसमध्ये असलेल्या मॅग्नेशिअम मुळे हाडांना बळकटी मिळते.
वजन नियंत्रणासाठी मदत
ब्राऊन राइस खाल्ल्याने पोट खूप काळ भरलेले राहते. परिणामी वारंवार काही ना काही खात राहण्याचे प्रमाण कमी होते. सातत्याने खाणे टाळले जाते त्यामुळे वजनावर चांगले नियंत्रण राहते.
(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)