कमी खर्चात भव्य लग्न करायचंय? वेळ आणि पैसा दोन्ही वाचवा,जाणून घ्या काही महत्त्वाच्या गोष्टी

जर तुम्हालाही कमी पैसे खर्च करून भव्य लग्न करायचे असेल तर जाणून घ्या लग्न खरेदीच्या टिप्स. यामुळे तुमचे पैसे ही वाचतील आणि वेळ ही वाचेल.
कमी खर्चात भव्य लग्न करायचंय? वेळ आणि पैसा दोन्ही वाचवा,जाणून घ्या काही महत्त्वाच्या गोष्टी

लग्नाची खरेदी म्हंटल की खूप पैसे खर्च होतात. जसजसा लग्नाचा हंगाम जवळ येतो तसतसे वेगवेगळे सामान, भरपूर कपडे, चप्पल, सॅन्डल, शुज, मेकअप, ज्वेलरी, अश्या एक ना अनेक गोष्टी या गरजेच्या असतात. मग खरेदीसाठी लागतो भरपूर वेळ आणि पैसा ही आडमाप खर्च होतो.  त्यासाठी काही लोकांना परवडणाऱ्या शॉपिंगच्या टिप्स माहिती असतात. त्यामुळे ते कमी खर्चात शाही लग्न करतात. पण, जर तुम्हालाही कमी पैसे खर्च करून भव्य लग्न करायचे असेल तर जाणून घ्या लग्न खरेदीच्या काही महत्त्वाच्या टिप्स. यामुळे तुमचे पैसे ही वाचतील आणि वेळ ही वाचेल.

लग्नाच्या वस्तूंची यादी बनवा 

जर तुम्हाला तुमची खरेदी काहीही न विसरता करायाची असेल तर लागणाऱ्या गोष्टींची यादी तयार करत रहा, तसेच त्यातील वस्तू, कुठून घ्यायच्या हे ही लगेचच ठरवा. जसे की, विवाह पोशाख, लग्नाचे दागिने, लग्नपत्रिका, खाद्यपदार्थ (लग्नाच्या किराणा मालाची यादी). प्रत्येक लग्नात या गोष्टी आवश्यक असतात. त्यामुळे लग्नाच्या पोशाख खरेदी करताताना फक्त वर आणि वधूची खरेदीची प्लानिंग करू नका, तर कुटुंबीय आणि नातेवाईकांचाही समावेश करा.

लग्नाचे बजेट बनवा

लग्नासाठी महत्त्वाच्या गोष्टींची यादी तयार केल्यानंतर, बजेट बनवणे खूप सोपे होईल. बजेट बनवण्यासाठी अनुभवी मित्र, नातेवाईकाची किंवा वेडिंग प्लॅनरची मदत घ्या. त्यानुसार तुमचे बजेट ठरवा. यामुळे खरेदी करताना तुमचा गोंधळ होणार नाही. जर तुम्हाला तुमचे लग्न 3 लाख, 4 लाख किंवा 10 लाख रुपयांमध्ये आयोजित करायचे असेल तर त्यानुसार गोष्टींचे योजना करा.

लग्नाचे कपडे कसे आणि कुठे खरेदी करावे?

सर्वात महत्वाची तुम्हाला कोणतीही शेरवानी, सूट, कोट-पँट घालायची आहे, त्याला जोडूनच वधूचा लेहेंगा, साडी, नऊवार या गोष्टी ठरवून घ्या, जर वर आणि वधू यांची खरेदी ही वेगवेगळी असेल तर खरेदी एकाच ठिकाणी करू शकता, त्यानंतर बिल वेगवेगळ करा. तसेच आधी नवीन ट्रेंड आणि किंमत ऑनलाइन तपासा. यानंतर तुमच्या स्थानिक बाजारपेठेत जा. येथे दरांची तुलना करा. तुम्हाला जिथे स्वस्त मिळेल तिथे खरेदी करा. जर तुम्हाला ऑनलाइन शॉपिंग करायची असेल तर तुम्ही या शॉपिंग साइट्स पाहू शकता. याशिवाय,काहीवेळा तुम्हाला ऑनलाइन खरेदी करताना कॅशबॅक किंवा अनेक सवलती मिळतात. वेगवेगळ्या ठिकाणाहून खरेदी केल्यास बचत होणार नाही, वेळ जास्त लागेल आणि त्रासही होईल.

लग्नाच्या दागिन्यांची खरेदी

सोन्या-चांदीच्या दागिन्यांची खरेदी ही लग्नाच्या ड्रेसइतकीच महत्त्वाची असते. जोडीदारासाठी अंगठ्यापासून मंगळसूत्र, राणीहार, जोडवे, कानातले, पैंजन पर्यंत सर्व प्रकारचे दागिने खरेदी करावे लागतात. बरेच लोक लग्नाच्या एक-दोन दिवस आधी दागिन्यांच्या खरेदीसाठी बाहेर पडतात. अशा परिस्थितीत दर महाग असतानाही सोने खरेदी करावे लागते. म्हणून, जर तुम्हाला लग्नाचे नियोजन 1-2 वर्षे आधीच माहित असेल तर एक एक दागिना खरेदी करात रहा.

अन्नपदार्थांवर पैसे कसे वाचवायचे?

पाहुण्यांच्या लक्षात राहतील ते लग्नाचे जेवण. लग्नाच्या पाहुण्यांना आमंत्रित करण्यात अजिबात संकोच करू नका. पाहुण्यांची यादी करा, मेन्यू ठरवा, यानंतर, ऑनलाइन किराणा मालाचे दर देखील तपासा. सरळ होलसेलच्या किराणा दूकाणात जाऊन सौदा करा. अशा प्रकारे तुम्ही या वस्तू स्वस्त दरात खरेदी करू शकता. अन्न वाया जाणार नाही याची काळजी ही घ्या.

स्वस्त किमतीत लग्नपत्रिका मुद्रित करा 

लग्नपत्रिका छापण्यासाठी खूप पैसे खर्च करण्याची गरज नाही. कागद आणि पैसे दोन्ही वाचवण्यासाठी बनवलेले ई-वेडिंग कार्ड मिळवा. छापील कार्डाशिवाय काम शक्य नसेल, तर तुम्ही ऑनलाइन ऑर्डर देऊ शकता. दूरच्या मित्रांना पोस्टाने लग्नपत्रिका पाठवण्याऐवजी ई-कार्ड पाठवा.

जेव्हा आपण लाखोंचा खर्च करतो तेव्हा हजारोंची बचत करणे हा तोट्याचा सौदा ठरणार नाही. कमीत कमी खर्चात तुम्ही अशा प्रकारे लग्नाचे आयोजन करू शकता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in