
आजच्या काळात सगळेच जण उत्तम फिटनेससाठी प्रयत्न करतात. त्यासाठी योगासन, झुंबा डान्स आणि अनेक गोष्टी करतात. सोबतच वजन कमी करण्यासाठी आहाराचेही नियमन करतात. अनेक वेळा वजन कमी करण्यासाठी किंवा वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारातून बटाटा कमी करण्याचा किंवा पूर्णपणे बंद करण्याचा सल्ला दिला जातो. जाणून घ्या बटाट्याचे अतिसेवन केल्याने काय तोटे होतात तसेच काय आहेत बटाट्याला पर्याय?
बटाट्याच्या अति सेवनामुळे आरोग्याला होणारे तोटे
वजन वाढते
बटाट्यामध्ये स्टार्च मोठ्या प्रमाणात असतो. बटाट्याचे अनेक पदार्थ तळून केलेले असतात. बटाटा आणि तेल या कॉम्बिनेशनमुळे वजन झपाट्याने वाढते.
रक्तातील साखरेची पातळी वाढते
बटाट्यामध्ये नैसर्गिक रित्या शर्करेचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे बटाट्याचे सातत्याने सेवन केल्याने मधुमेहच्या रुग्णांना बटाट्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढण्याचा धोका असतो. विशेषकरून टाईप २ च्या मधुमेहच्या रुग्णांनी बटाटा आहारातून पूर्णपणे वर्ज्य करावा असा सल्ला डॉक्टर देतात.
उच्च रक्तदाबाचा धोका
काही अभ्यासानुसार बटाट्याचे सातत्याने महिनाभर सेवन केल्यास उच्च रक्तदाबाचा त्रास संभवण्याचा धोका असतो.
मुळव्याध, फिशर, फिस्तुला
मुळव्याध, फिशर, फिस्तुला या आजारांमध्ये बटाटा हा पूर्णपणे वर्ज्य करण्याचा सल्ला दिला जातो. बटाट्यामुळे या आजारात मोठ्या प्रमाणात त्रास वाढतो.
या भाज्या आहेत बटाट्याला पर्याय
कच्ची केळी
बटाट्याला कच्ची केळी हा एक उत्तम पर्याय आहे. कच्च्या केळीपासून बटाट्याप्रमाणेच वेगवेगळ्या भाज्या तयार करता येतात. तसेच कच्ची केळी अतिशय पौष्टिक असतात.
रताळू
रताळू हे सामान्यपणे अनेकजण उपवासाचा पदार्थ म्हणून खातात. मात्र रताळू हा देखील बटाट्याला एक चांगला पर्याय ठरतो.
सुरण
सुरण हे देखील बटाट्यासाठी एक चांगले पर्याय आहे. सुरणाची भाजी अनेक प्रकारे बनवता येते.
(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)