श्वसनप्रक्रिया मजबूत करायची आहे? निरोगी फुफ्फुसांसाठी 'हे' ५ नैसर्गिक पदार्थ

आपल्या दररोजच्या धावपळीतून आपल्या आरोग्याची नीट काळजी घेणे महत्त्वाचे आहेच, पण आरोग्याच्या दृष्टीकोनातून फुफ्फुस निरोगी ठेवणे खूप आवश्यक आहे.
श्वसनप्रक्रिया मजबूत करायची आहे? निरोगी फुफ्फुसांसाठी 'हे' ५ नैसर्गिक पदार्थ
फोेटे सौ FPJ
Published on

आपल्या दररोजच्या धावपळीतून आरोग्याची नीट काळजी घेणे महत्त्वाचे आहेच, पण आरोग्याच्या दृष्टीकोनातून फुफ्फुस निरोगी ठेवणे खूप आवश्यक आहे. फुफ्फुस हे श्वसन संस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे, जे आपल्या शरीराला ऑक्सिजन पुरवतात आणि शरीरातील कार्बन डायऑक्साइडसारखे टाकाऊ वायू बाहेर फेकतात. यामुळे फुफ्फुस निरोगी तर शरीर निरोगी..

फुफ्फुस निरोगी ठेवणे सोपे आहे फक्त त्यासाठी योग्य आहार गरजेचा आहे. काही नैसर्गिक अन्न आणि औषधी वनस्पती फुफ्फुसांना मजबूत करण्यास मदत करतात. कोणकोणते अन्न आणि वनस्पती फुफ्फुसांना मजबूत करण्यासाठी कश्या पद्धताने कार्य करतात ते एकदा नक्की पाहा.

सफरचंद

दररोज एक सफरचंद खा आणि डॉक्टरापासून दूर राहा! हे वाक्य खरंच योग्य आहे. सफरचंद खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळू शकतात. सफरचंदामधील क्वेर्सेटिन हा अँटिऑक्सिडंट, धूर आणि इतर प्रदूषणांपासून फुफ्फुसांचे संरक्षण करण्यास मदत करतो. दुपारच्या वेळेत इतर फळांपेक्षा सफरचंद निवडा.

फोेटे सौ FPJ

चहा

काळ्या चहामध्ये आलं उकळून चहा पिल्याने फुफ्फुसांसाठी खूप फायदेशीर ठरते. चहामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स फुफ्फुसांसाठी चांगले असतात. सकाळी किंवा दुपारी ब्लॅक टी पिणे ब्लॅक कॉफीपेक्षाही चांगले आहे.

फोेटे सौ FPJ

हळद

दररोज हळद सेवन केल्याने शरीराला अनेक फायदे होतात. हळद दूध किंवा गरम पाण्यासोबत घेतल्यास श्वसनमार्गातील जळजळ कमी होण्यास मदत होते. हळदीतील कर्क्युमिन हे घटक फुफ्फुसांना स्वच्छ करण्यात मदत करतात आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकतात, यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते.

फोेटे सौ FPJ

पुदिना (पेपरमिंट)

ताज्या पुदिन्याचा सुगंध फक्त तोंडाला ताजेतवाना ठेवत नाही, तर शरीरालाही फायदेशीर ठरतो. पुदिन्याच्या तेलाचे काही थेंब पाण्यात टाकून पिल्यास श्वसन सुधारते, कारण पुदीना श्वसननलिकेला जोडलेल्या संबंधित नलिकांना आराम देतो. यासाठी रोज गरम पाण्यात ३-४ थेंब पुदिना तेल टाकून वाफ घ्या.

फोेटे सौ FPJ

निलगिरी तेल

निलगिरी तेल फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. उकळत्या पाण्यात काही थेंब निलगिरी तेल टाकून १० मिनिटे वाफ घ्या. यामुळे खोकल्याच्या त्रासापासून देखील आराम मिळतो.

फोेटे सौ FPJ

(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

logo
marathi.freepressjournal.in