सातत्याने मोबाईल वापरल्याने फक्त डोळ्यांच्याच नाही तर 'या' आरोग्य समस्याही निर्माण होऊ शकतात; जाणून घ्या उपाय

आपण डिजिटल युगात जगत आहोत. आत्ताचे युग हे 'एम' युग आहे अर्थात मोबाईलचे युग आहे. मोबाईल मुळे संपूर्ण जग आपल्या तळहातावर आले आहे. परिणामी आपण सातत्याने मोबाईलचा वापर करत असतो. सातत्याने मोबाईलच्या वापरामुळे फक्त डोळ्यांच्याच नाही तर अन्य आरोग्य समस्याही उद्भवू शकतात. जाणून घ्या कोणकोणते आजार होऊ शकतात सोबतच योग्य उपाय...
सातत्याने मोबाईल वापरल्याने फक्त डोळ्यांच्याच नाही तर 'या' आरोग्य समस्याही निर्माण होऊ शकतात; जाणून घ्या उपाय
Freepik
Published on

आपण डिजिटल युगात जगत आहोत. आत्ताचे युग हे 'एम' युग आहे अर्थात मोबाईलचे युग आहे. मोबाईल मुळे संपूर्ण जग आपल्या तळहातावर आले आहे. परिणामी आपण सातत्याने मोबाईलचा वापर करत असतो. सातत्याने मोबाईलच्या वापरामुळे फक्त डोळ्यांच्याच नाही तर अन्य आरोग्य समस्याही उद्भवू शकतात. जाणून घ्या कोणकोणते आजार होऊ शकतात सोबतच योग्य उपाय...

डोळ्यांच्या समस्या

मोबाईल स्क्रीनमधून निघणारा निळा प्रकाश डोळ्यांसाठी हानिकारक असतो. जास्त वेळ स्क्रीनकडे पाहिल्याने डोळ्यांचा कोरडेपणा, डोळ्यांची जळजळ, अंधुक दृष्टी या समस्या होऊ शकतात. याशिवाय, दृष्टी देखील खराब होऊ शकते.

मायग्रेन आणि डोकेदुखी वाढू शकते.

मोबाईल फोनचा सतत वापर केल्याने डोळ्यांवर दबाव येतो, ज्यामुळे डोकेदुखी किंवा मायग्रेन होऊ शकते. ज्यांना आधीच मायग्रेनचा त्रास आहे, त्यांनी सातत्याने मोबाईल स्क्रीनचा वापर केल्याने ते आणखी वाढू शकते.

ताण वाढू शकतो

आजकाल लोक सोशल मीडियावर तासनतास घालवतात. अशा परिस्थितीत, सतत मोबाईल वापरल्याने तुम्हाला ताण, चिंता आणि नैराश्यासारख्या समस्यांनी घेरले जाऊ शकते. कारण अनेकदा रीलमधील कंटेंट नकारात्मक असतो. या कंटेंटचा डोक्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

निद्रानाशाची समस्या

रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल वापरल्याने शरीरात मेलाटोनिन हार्मोनचे उत्पादन कमी होते. खरं तर चांगल्या झोपेसाठी हे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला निद्रानाशाची समस्या असू शकते.

मान आणि पाठदुखी

मोबाईल फोन वापरताना लोक मान वाकवून ठेवतात. यामुळे टेक्स्ट सिंड्रोमची समस्या उद्भवू शकते. जर ही सवय बराच काळ चालू राहिली तर पाठ आणि मान दुखू शकते. जर सवय बदलली नाही तर भविष्यात ती अधिक गंभीर समस्या बनू शकते.

काय आहेत उपाय?

स्क्रीन टाईम कमी करणे

स्क्रीन टाईम कमी करणे हा सर्वोत्तम उपाय आहे. स्क्रीन टाईम कमी करणे अर्थात दिवसभरात असा वेळ राखीव ठेवणे जेव्हा तुम्ही कोणत्याही प्रकारची स्क्रीन पाहणार नाही. या काळात तुम्ही पुस्तक वाचा, खेळ खेळा किंवा तुमचे आवडीचे छंद जोपासा.

२०-२०-२० चा नियम

मोबाईल, लॅपटॉप, डेस्कटॉपवर काम करताना दर २० मिनिटांनी २० फूट अंतरावरील एखादी वस्तू २० सेकंदांसाठी पाहावी.

नाईट मोड वापरा

मोबाईलचा निळा प्रकाश डोळ्यांसाठी हानिकारक आहे. हे कमी करण्यासाठी, नाईट मोड चालू करा.

रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल पाहू नका

रात्री झोपण्यापूर्वी किमान एक तास आधी मोबाईल वापरू नका. यामुळे तुमचे झोपेचे शेड्यूल बिघडणार नाही.

(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही.)

logo
marathi.freepressjournal.in