Weight Loss : झटपट वजन कमी करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी 'या' चार गोष्टी करा

वाढलेले वजन ही आजच्या काळातील मोठी समस्या आहे. चुकीची जीवनशैली, अस्वास्थकर आहार पद्धती इत्यादींमुळे वजन वाढण्याची मोठी समस्या अनेकांना भेडसावत आहे. अनेक जण वजन वाढल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे डाएट फॉलो करतात. मात्र, तरीही वजन कमी होत नाही. तर मग 'या' चार गोष्टी रात्री झोपण्यापूर्वी आठवणीने करा. वजन झटपट कमी होईल.
Weight Loss : झटपट वजन कमी करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी 'या' चार गोष्टी करा
Freepik
Published on

वाढलेले वजन ही आजच्या काळातील मोठी समस्या आहे. चुकीची जीवनशैली, अस्वास्थकर आहार पद्धती इत्यादींमुळे वजन वाढण्याची मोठी समस्या अनेकांना भेडसावत आहे. अनेक जण वजन वाढल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे डाएट फॉलो करतात. मात्र, तरीही वजन कमी होत नाही. तर मग 'या' चार गोष्टी रात्री झोपण्यापूर्वी आठवणीने करा. वजन झटपट कमी होईल.

रात्रीचे जेवण लवकर करा

अन्नाचे पचन चांगले होण्यासाठी रात्री उशिरा जेवण करणे टाळा. आपल्या भारतीय परंपरेत सूर्यास्तापूर्वी जेवणे चांगले मानले गेले आहे. मात्र, आजच्या जीवनशैलीत हे शक्य होत नाही. तरीही रात्री ८ वाजेपर्यंत जेवणाचा प्रयत्न करा. यामुळे अन्न पचन होण्यासाठी मोठा वेळ मिळतो. अन्न चांगले पचन होते. शिवाय झोपही उत्तम होते.

जेवणानंतर शतपावली करणे

रात्रीच्या जेवणानंतर शतपावली हमखास करायला हवी. मुळात दुपारच्या जेवणानंतरही शतपावली करायला हवी मात्र, अनेक वेळा आपल्या कार्यालयाच्या ठिकाणी हे शक्य होत नाही. मात्र, तुम्ही रात्री घरी असतात त्यामुळे जेवणानंतर शतपावली करणे शक्य असते. शतपावली केल्याने जेवणानंतर जड वाटत असेल तर ताबडतोब हलके वाटेल. शतपावली केल्यामुळे शारीरिक हालचाली होतात. यामुळे अन्न उत्तमरित्या पचायला मदत होते. परिणामी वजन कमी होते.

वज्रासन करणे

रात्री झोपण्यापूर्वी वज्रासन करणे वजन कमी करण्यासाठी अतिशय उत्तम असते. वज्रासन केल्याने पचनक्रिया सुधारते. बद्धकोष्ठता होत नाही. सकाळी दुसऱ्यादिवशी पोट लवकर साफ होते. पोट व्यवस्थित साफ झाल्याने शरीरातील सर्व विषारी घटकद्रव्ये बाहेर पडतात. त्यामुळे वज्रासन करणे वजन कमी करण्यासाठी फायद्याचे ठरते.

मोबाईल आणि स्क्रीनपासून दूर राहा

झोपण्यापूर्वी मोबाईल, लॅपटॉप किंवा टीव्ही पाहणे झोपेची गुणवत्ता खराब करते. निळा प्रकाश मेलाटोनिन हार्मोनवर परिणाम करतो, ज्यामुळे झोपेची समस्या उद्भवू शकते. झोपेच्या कमतरतेमुळे शरीरात घरेलिन (भूक वाढवणारे हार्मोन) वाढते, ज्यामुळे वजन वाढण्याचा धोका वाढतो. त्यामुळे झोपण्याच्या एक तास आधी स्क्रीनपासून दूर राहा आणि पुस्तक वाचणे किंवा ध्यान करणे यासारख्या सवयी लावा, जेणेकरून तुम्हाला रात्री चांगली झोप लागेल.

(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

logo
marathi.freepressjournal.in