
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या भागलपूर येथील रॅलीत मखान्याला Superfood म्हणून संबोधले. त्यानंतर Superfood बाबत पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात चर्चा होऊ लागली आहे. अनेकांना Superfood म्हणजे काय असा प्रश्न पडत असेल. Superfood मध्ये कोणकोणत्या पदार्थांचा किंवा आहाराचा समावेश होतो. हे आपण इथे जाणून घेऊ या.
सामान्यपणे ज्या आहारातून शरीराला पोषण देणारी पोषक तत्वे मोठ्या प्रमाणात मिळतात. त्या आहाराला Superfood असे म्हटले जाते. मात्र, ही वैज्ञानिक संकल्पना नाही तर व्यवहारात फूड प्रोडक्ट्स निर्माण करणाऱ्या कंपन्यांकडून याचा उपयोग केला जातो. मात्र, ही संकल्पना आता सर्वसामान्य झाली आहे.
Superfood हा शब्द कोठून आला?
समान्यपणे असे मानले जाते की २० व्या शतकाच्या सुरुवातीला केळी या फळाची व्यावहारिकता वाढवण्यासाठी हा शब्दप्रोयग करण्यात आला होता. माहितीनुसार, द सायंटिफिक मंथलीच्या १९१८ च्या खंडात प्रकाशित झालेल्या एका लेखात, लेखक सॅम्युअल सी. प्रेस्कॉट यांनी या शब्दाचा सर्वप्रथम वापर केल्याची माहिती आहे. गेल्या १०० वर्षात हळूहळू या संकल्पनेचा विस्तार झाला. इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या वापरामुळे Superfood ही संकल्पना जवळपास मोठ्या प्रमाणात वापरली जाऊ लागली.
Superfood मध्ये कोणकोणत्या आहाराचा समावेश होतो?
सामान्यपणे Superfood मध्ये अशा आहाराचा समावेश केला जातो ज्यामध्ये जीवनसत्वे आणि पोषणमुल्ये मोठ्या प्रमाणात आहेत. ज्याचा आहारात नियमित सेवन केल्याने शरीरातील संबंधित पोषणमुल्यांची उणीव भरून निघते. त्या आहाराचा Superfood मध्ये समावेश होतो. उदाहणार्थ तुमच्या शरीरात प्रोटीनची कमतरता आहे. तर ज्या आहारातून प्रोटीन मोठ्या प्रमाणात मिळते, अशा आहार पदार्थाला Superfood म्हणू शकतात. ज्या अन्नातून एकाच वेळी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांमधून बरे होण्यासाठी पौष्टिक तत्वे मिळत असतील तर त्याला Superfood चा दर्जा दिला जातो.
काय असतात Superfood ची वैशिष्ट्ये
सुपरफूडमध्ये अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर, प्रोबायोटिक्स, हेल्दी फॅट्स मोठ्या प्रमाणात असणे ही Superfood ची वैशिष्ट्ये असतात.
ब्लूबेरी, केल, ओट्स, ब्रोकोली, सॅल्मन, मखाना, हळद, नाचणीसत्व, हरभरा, मोरिंगा, ओट्स ही Superfood ची काही उदाहरणे आहेत. तर Superfood सोबतच Superfruit आणि Supergrain या संकल्पना देखील आता अस्तित्वात आल्या आहेत. Supergrain मध्ये जवस, बकव्हीट, बार्ली इत्यादींचा समावेश होतो. तर Superfruit मध्ये केळी, सफरचंद, नाशपाती इत्यादींचा समावेश होतो.