Mono Diet : काय आहे मोनो डाएट? वजन कमी करण्यासाठी खरोखर उपयुक्त की होऊ शकतात गंभीर परिणाम? जाणून घ्या सविस्तर

वजन कमी करण्यासाठी मोनो डाएट (Mono Diet) सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे. मात्र, हा डाएट किती योग्य आहे. त्याने खरंच वजन कमी होते की याचे काही दुष्परिणामही संभवतात. चला जाणून घेऊ तज्ज्ञ काय सांगतात.
Mono Diet : काय आहे मोनो डाएट? वजन कमी करण्यासाठी खरोखर उपयुक्त की होऊ शकतात गंभीर परिणाम? जाणून घ्या सविस्तर
प्रातिनिधिक छायाचित्र - Freepik AI Generated Image
Published on

वाढलेले वजन ही एक मोठी समस्या आहे. परिणामी वजन कमी करण्यासाठी अनेक जण अनेक प्रकारचे उपाय करतात. मग त्यासाठी ते वेगवेगळ्या प्रकारचे डाएट करतात. हल्ली सोशल मीडियामुळे अनेक वजन कमी करण्यासाठी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या डाएटचा सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सकडून प्रचार केला जातो. ज्याच्या प्रभावात येऊन अनेक जण तज्ज्ञांच्या कोणत्याही मार्गदर्शनाशिवाय अशा प्रकारचे डाएट फोलो करतात. त्यातच वेगवेगळे सेलिब्रिटी देखील वेगवेगळ्या प्रकारच्या डाएटबद्दल सांगत असतात. त्यांचाही मोठा प्रभाव पडतो. मोनो डाएट किंवा मोनोट्रॉफिक डाएट (Mono Diet) हा देखील असाच डाएट प्रकार आहे. जो सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे. मात्र, हा डाएट किती योग्य आहे. त्याने खरंच वजन कमी होते की याचे दुष्परिणाम देखील संभवतात. चला जाणून घेऊ तज्ज्ञ काय सांगतात.

मोनो डाएट म्हणजे काय?

मोनो डाएट हा डाएटचा खूप सोपा प्रकार आहे. ज्यामध्ये तुम्ही दीर्घकाळासाठी फक्त आणि फक्त एकच अन्नपदार्थ खाणे समाविष्ट आहे. त्यामुळे यामध्ये कोणताही गुंतागुंतीचा प्रकार नाही. तसेच कॅलरी मोजत बसण्याची गरज पडत नाही. मग ते कोणतेही असू शकते. यामध्ये विविध प्रकारची फळे, अंडी, बटाटे, तपकिरी तांदूळ, चिकन ब्रेस्ट किंवा काजू, कोबी अशा प्रकारे कोणताही एकच अन्नपदार्थ किंवा अन्नपदार्थांच्या एकाच गटाचा आहारात समावेश करणे याला मोनो डाएट म्हणतात. उदाहरणार्थ तुम्ही दररोज फक्त आणि फक्त केळी खाण्याचा डाएट स्वीकारू शकता किंवा दररोज फक्त अंडी खाणे किंवा दररोज केवळ सफरचंद खाणे असे पर्याय तुम्ही निवडू शकता. मात्र त्या व्यतिरिक्त काहीही जेवायचे नाही. अशाप्रकारच्या डाएटमुळे लवकर वजन कमी होते, अशा प्रकारचे दावे केले जातात. परिणामी ज्यांना काहीही करून वजन कमी करायचे असते ते अशा प्रकारचे डाएट स्वीकारू शकतात.

मोनो डाएटमुळे खरोखर वजन कमी होते का?

हल्ली अनेक सेलिब्रिटी तसेच सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्स मोनो डाएट बद्दल सांगतात. तज्ज्ञांच्या मते जेव्हा तुम्हाला एखाद्या विशिष्ट काळात वजन कमी करायचे असते. तेव्हा मोनो डाएट सर्वोत्तम असते. मोनो डाएटमुळे वजन निश्चित कमी होते. म्हणजे तुम्हाला विशिष्ट प्रसंगासाठी वजन कमी करायचे असेल त्याच्या आधी एक आठवडा ते १५ दिवस तुम्ही हे डाएट फोलो केल्यास त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. मात्र, जेव्हा तुम्हाला दीर्घकाळासाठी तुमचे वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर तुम्हाला मोनो डाएट फायदेशीर नाही. उलट त्याचे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात.

मोनो डाएटचे तोटे

तज्ज्ञ सांगतात की वजन कायमस्वरुपी नियंत्रणात ठेवायचे असेल तर त्यासाठी सर्वसमावेशक आहार घेणे हेच योग्य आहे. शॉर्टकट्स शोधण्याच्या मानवी प्रवृत्तीचा फायदा घेत सोशल मीडियावर मोनो डाएटचा अतिरेकी प्रचार केलेला पाहायला मिळतो. मात्र निरोगी जीवन आणि कायमस्वरुपी वजन नियंत्रणासाठी संतुलित वैविध्यपूर्ण पौष्टिक आहार घेणे हेच योग्य आहे. असे तज्ज्ञ सांगतात.

मोनो डाएटमध्ये केवळ एकाच प्रकारचे अन्न खाल्ल्यामुळे वजन कमी होते मात्र त्यामुळे आवश्यक प्रथिने, निरोगी चरबी, जटिल कार्बोहायड्रेट्स या गोष्टी गमावून बसता. परिणामी चयापचय क्रियेवर याचे गंभीर परिणाम होतात.

अतिरेकामुळे पोषक विषारीपणा संभवतो. उदाहरणार्थ नेहमीच नारळ पाणी पिल्याने पोटॅशिअमचे प्रमाण वाढते. परिणामी हृदयाचे ठोके अनियमित होतात. फक्त केळी खाल्ल्यामुळे कार्बोहायड्रेटचे जास्त प्रमाणात सेवन केले जाते. परिणामी रक्तातील साखरेची पातळी आणि स्वादुपिंडाच्या कार्यावर याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.

मानसिक आरोग्यावर होणारे परिणाम

मोनो डाएटमध्ये कायम एकच अन्न किंवा एकाच प्रकारच्या गटातील अन्न खाल्ल्याने खाण्यासंबंधीच्या अनेक मानसिक विकृतींना जन्म देऊ शकता. यामुळे तुम्हाला काही काळानंतर एकाच प्रकारच्या चवीमुळे अजिबात भूकच न लागणे, जेवणाची इच्छाच मरणे किंवा सातत्याने खात सुटणे अशा प्रकारचे मानसिक आजार संभवू शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे.

logo
marathi.freepressjournal.in