ओव्हरड्राफ्ट की वैयक्तिक कर्ज काय असते फायद्याचे? जाणून घ्या, मुख्य फरक

अनेक जणांच्या मते वैयक्तिक कर्जापेक्षा ओव्हरड्राफ्ट फायदेशीर असे मानतात. चला जाणून घेऊ या ओव्हरड्राफ्ट आणि वैयक्तिक कर्ज यामध्ये मुख्य फरक काय आहे. तुमच्यासाठी काय योग्य आणि फायदेशीर आहे, हे तुम्हीच ठरवा...
ओव्हरड्राफ्ट की वैयक्तिक कर्ज काय असते फायद्याचे? जाणून घ्या, मुख्य फरक
Freepik
Published on

जनधनखात्यातून खात्यात बॅलन्स नसतानाही तुम्ही किमान १० हजार रुपये काढण्याची सुविधा ओव्हरड्राफ्टद्वारे देण्यात आली. त्यानंतर गेल्या काही वर्षात ओव्हरड्राफ्ट हा शब्द खूप चर्चेत आहे. अनेक जणांच्या मते वैयक्तिक कर्जापेक्षा ओव्हरड्राफ्ट फायदेशीर असे मानतात. चला जाणून घेऊ या ओव्हरड्राफ्ट आणि वैयक्तिक कर्ज यामध्ये मुख्य फरक काय आहे. तुमच्यासाठी काय योग्य आणि फायदेशीर आहे, हे तुम्हीच ठरवा...

ओव्हरड्राफ्ट म्हणजे काय?

खात्यात पैसे नसतानाही तुम्ही एक विशिष्ट ठाराविक रकम बँक खात्यातून काढू शकता. या सुविधेला ओव्हरड्राफ्ट म्हणतात. गेल्या काही वर्षांपूर्वी ही सुविधा जनधनखात्यासाठी सुद्धा सुरू करण्यात आली. त्यानंतर हा विषय मोठ्या प्रमाणात चर्चेत आला आहे. ज्यांचे जनधन खाते नाही ते देखील त्यांच्या बँकेतून ओव्हरड्राफ्टची सुविधा मिळवू शकता. मात्र, अनेक बँका ही सुविधा केवळ करंट आणि सॅलरी खात्यावर देते. तर काही बँका आता बचत खात्यावरही ही सुविधा देत आहे.

ओव्हरड्राफ्टवर किती व्याज पडते

ओव्हरड्राफ्ट एका निश्चित रकमेपर्यंत घेता येत असला तरी ही रकम एक प्रकारचे कर्ज असते. त्यामुळे बँक यावर व्याज आकारते. वेगवेगळ्या बँका ओव्हरड्राफ्टसाठी २ टक्क्यांपासून ते १२ टक्क्यांपर्यंत व्याजदर आकारतात. मात्र, हे व्याज तुम्ही वापरलेल्या रकमेवरच आकारले जाते. उदाहरणार्थ तुम्ही १० हजार रुपयांचा ओव्हरड्राफ्ट काढला असेल. मात्र, तुम्ही त्यातील केवळ ६००० रुपयेच प्रत्यक्ष काढले असतील तर व्याज ६००० रुपयांवरच लागते.

ओव्हरड्राफ्ट परतफेडीचा कालावधी

ओव्हरड्राफ्ट करून घेतलेले कर्ज परतफेडीसाठी कोणतीही वेळ निश्चित नसते. तुम्ही तुमच्या सोयीनुसार ते फेडू शकता. मात्र, बँक नियमानुसार त्यावर शुल्क आकारू शकते.

कर कपातीचा फायदा मिळत नाही

ओव्हरड्राफ्टमध्ये कर कपातीचा फायदा मिळत नाही. कारण त्याला क्रेडिट लाईन मानले जाते.

ओव्हरड्राफ्ट लगेच मंजूर केले जाते

बँकांकडून सहसा ओव्हरड्राफ्ट लगेच मंजूर केले जाते. त्याला फार मोठी प्रक्रिया करावी लागत नाही. मात्र, वारंवार ओव्हरड्राफ्टची सुविधा घेतल्याने तुमचा सिबिल स्कोअर खराब होण्याची शक्यता असते.

वैयक्तिक कर्ज

वैयक्तिक कर्ज हे तुम्ही तुमच्या नावावर तुमच्या वैयक्तिक कामांसाठी मिळवू शकता. अर्थात अनेकजण हे कर्ज व्यवसायातील आर्थिक अडचण दूर करण्यासाठीच घेतात.

वैयक्तिक कर्जासाठी मोठी प्रक्रिया

वैयक्तिक कर्ज मंजूर होण्यासाठी एक मोठी प्रक्रिया बँकांकडून पार पाडली जाते. त्यानंतरच ते तुमचे एकूण उत्पन्न आणि परतफेड करण्याची क्षमता पाहून दिले जाते.

जामिनदाराची आवश्यकता

मोठे वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी जामीनदाराची आवश्यकता भासू शकते. तुमचा मागील सिबिल स्कोर चांगला नसेल तर बँक जामीनदाराची अट ठेवू शकते.

वैयक्तिक कर्ज परतफेड

वैयक्तिक कर्ज व्याजासह परतफेड करताना त्याचे निश्चित मासिक हफ्ते ठरवून दिलेले असतात. त्यानुसार तुम्ही तो मासिक हफ्ता चुकवल्यास बँक तुमच्याकडून दंड वसूल करू शकते. तसेच वैयक्तिक कर्ज परतफेडीसाठी निश्चित कालावधी असतो.

ओव्हरड्राफ्ट की वैयक्तिक कर्ज काय उत्तम?

ओव्हरड्राफ्ट आणि वैयक्तिक कर्ज दोन्ही कर्जाचेच प्रकार असले तरी तुमची गरज कशी आहे यावर तुम्ही ओव्हरड्राफ्ट किंवा वैयक्तिक कर्ज निवडू शकता. ओव्हरड्राफ्टला काही मर्यादा असतात. ते आणीबाणीच्या प्रसंगी घेतलेले चांगले असते. तर वैयक्तिक कर्ज तुम्हाला जेव्हा मोठ्या आर्थिक गरजा पूर्ण करायच्या असतात आणि दीर्घकालीन हवे असते तेव्हा घेतलेले चांगले असते.

(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

logo
marathi.freepressjournal.in