कोल्ड प्रेस्ड आणि रिफाइंड तेलात काय फरक आहे? जाणून घ्या आरोग्यासाठी कोणते चांगले?

गेल्या दशकापासून हळहळू पुन्हा कोल्ड प्रेस्ड तेल स्वयंपाकासाठी वापरण्याकडे लोकांचा कल दिसून येत आहे. जाणून घेऊ या काय आहे. कोल्ड प्रेस्ड आणि रिफाइंड तेलातील फरक...
कोल्ड प्रेस्ड आणि रिफाइंड तेलात काय फरक आहे? जाणून घ्या आरोग्यासाठी कोणते चांगले?
Published on

आरोग्याबाबत लोक हळूहळू जागरूक होत आहेत. तसेच आरोग्यासाठी कोणते तेल उत्तम असेल याबाबत ग्राहक आता अधिक चौकसपणे विचार करू लागले आहेत. पॅकिंगच्या तेलासह भारतीय बाजारात रिफाइंड तेलांनी प्रवेश केला. जाहिरातीच्या भूलभूलैय्यात अडकून जवळपास सर्वांच्याच स्वयंपाक घरात हे तेल पोहोचले. मात्र, गेल्या दशकापासून हळहळू पुन्हा कोल्ड प्रेस्ड तेल स्वयंपाकासाठी वापरण्याकडे लोकांचा कल दिसून येत आहे. जाणून घेऊ या काय आहे. कोल्ड प्रेस्ड आणि रिफाइंड तेलातील फरक...

रिफाइंड तेल म्हणजे काय?

रिफाइंड तेल हे अति उच्च तापामानात आणि विविध रसायनांचा प्रयोग करून तयार केले जाते. त्याला रिफाइंड तेल म्हणतात.

कोल्ड प्रेस्ड तेल काय असते?

पारंपारिक पद्धतीने घाण्याचे तेल किंवा यंत्रांचा वापर करून सामान्य तापमानात आणि दबावात काढलेले तेल हे कोल्ड प्रेस्ड तेल असते.

कोल्ड प्रेस्ड की रिफाइंड कोणते तेल आरोग्याला चांगले?

रिफाइंड तेल अतिउच्च तापमानात आणि रसायनांचा उपयोग करून तयार केल्याने या तेलातील पौष्टिक तत्व नष्ट होतात. तसेच चवही चांगली लागत नाही. तर कोल्ड प्रेस तेलात सामान्य तापमान असते आणि रसायनांचा उपयोग केला जात नाही. त्यामुळे यातील सर्व पौष्टिक घटक टिकून राहतात. त्यामुळे हे तेल आरोग्यासाठी उत्तम मानले जाते.

कोल्ड प्रेस्ड तेलाचे आरोग्यासाठी काय आहेत फायदे?

गुडघेदुखीवर मात

कोल्ड प्रेस्ड तेलात पौष्टिक तत्व असतात. जे गुडघेदुखी आणि सांधेदुखी आणि स्नायूंशी संबंधीत सर्वच आजारांवर उपयोगी असते. यामुळे हाडे बळकट होतात.

हृदयासाठी चांगले

कोल्ड प्रेस्ड तेलात कोणतेही रासायनिक प्रक्रिया झालेली नसते त्यामुळे हे तेल हृदयासाठी उत्तम असते.

(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

logo
marathi.freepressjournal.in