Travel Tips: हिमालयाच्या कुशीत वसलेले भगवान शंकरांचे मंदिर केदारनाथ भक्तांसाठी उघडले आहे. हे भारतीयांच्या श्रद्धेचे केंद्र आहे. बद्रीनाथ, द्वारका आणि रामेश्वरमसह केदारनाथचा चारधाम यात्रेत समावेश असतो. केदारनाथचे दरवाजे मे महिन्यात भाविकांसाठी खुले झाले आहेत. दरवर्षी हजारो भाविक येथे भगवान भोलेनाथाच्या दर्शनासाठी येतात. यंदा जर तुम्हीही केदारनाथला जाण्याचा विचार करत असाल तर या प्रवासात कोणत्या गोष्टी आवर्जून घेऊन जायला हव्यात ते जाणून घ्या. केदारनाथ यात्रेची संपूर्ण चेकलिस्ट जाणून घ्या.
कागदपत्रे
केदारनाथलाच्या ट्रिपमध्ये ओळखपत्र, केदारनाथ यात्रेसाठी नोंदणी आणि त्यासंबंधीची कागदपत्रे सोबत ठेवणे आवश्यक आहे.
ट्रेकिंगसाठी आवश्यक गोष्टी
केदारनाथला खूप मोठा ट्रेक करून जावे लागते. ही चढाई फार कठीण आहे. त्यामुळे ट्रेकिंगसाठी योग्य दर्जाचे शूज घेऊन जा. आरामदायक कपडे, चढताना आधारासाठी काठी, पाण्याची बाटली, स्वेटर, रेनकोर्ट घेऊन जा.
पैसा
केदारनाथला ट्रीपला जाताना रोख रक्कम घेऊन जा. कारण अशा ठिकाणी नेटवर्क नसते त्यामुळे एटीएम किंवा ऑनलाइन पेमेंट करता येत नाही. अशा स्थितीत तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. काही रोख रक्कम सोबत ठेवा.
मेडिकल किट
स्वतःचे मेडिकल किट घेऊन जायला विसरू नका. या किटमध्ये पॅनाडोल, मलमपट्टी, डोकेदुखीचे औषध, पेन किलर आणि प्रथमोपचार संबंधित गोष्टी यासारख्या अत्यावश्यक औषधांचा समावेश असावा.
(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. या माहितीची 'नवशक्ति' पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)