होळी कधी आहे? १३ की १४ मार्च; जाणून घ्या तारीख, वेळ, महत्त्व

रंग आणि आनंदाचा उत्साही सण होळी दरवर्षी मोठ्या उत्सुकतेने साजरा केला जातो. लोक होळीचे रंग, पाण्याच्या पिचकाऱ्या, फुगे यांची आठवडाभर आधीच तयारी करतात. तर गुज्यासारख्या पारंपारिक मिठाई बनवण्याची तयारी करतात. हिंदू धर्मातील सण, उत्सव हे चांद्र वर्षाप्रमाणे येतात. त्यामुळे ते तिथीनुसार कधी एक दिवस तर कधी दोन दिवस विभागून येतात.
होळी कधी आहे? १३ की १४ मार्च; जाणून घ्या तारीख, वेळ, महत्त्व
होळी कधी आहे? १३ की १४ मार्च; जाणून घ्या तारीख, वेळ, महत्त्व Pinterest
Published on

रंग आणि आनंदाचा उत्साही सण होळी दरवर्षी मोठ्या उत्सुकतेने साजरा केला जातो. लोक होळीचे रंग, पाण्याच्या पिचकाऱ्या, फुगे यांची आठवडाभर आधीच तयारी करतात. तर गुज्यासारख्या पारंपारिक मिठाई बनवण्याची तयारी करतात. हिंदू धर्मातील सण, उत्सव हे चांद्र वर्षाप्रमाणे येतात. त्यामुळे ते तिथीनुसार कधी एक दिवस तर कधी दोन दिवस विभागून येतात. त्यामुळे दरवर्षी उद्भवणारा एक सामान्य प्रश्न म्हणजे उत्सवाची नेमकी तारीख काय आहे विशेषतः होळी आणि होलिका दहन एकाच दिवशी होतील का?

२०२५ मध्ये, होलिका दहन आणि रंग खेळण्याच्या तारखांबाबत गोंधळ आहे. काहींचा दावा आहे की दोन्ही १३ मार्च रोजी आहेत, तर काहींच्या म्हणण्यानुसार भद्रा काळ रंगोत्सव पुढे ढकलेल. १३ मार्चला तारखेला फक्त होलिका दहन करण्याची परवानगी देईल.

पंचांगानुसार, पौर्णिमा तिथी १३ मार्च रोजी सकाळी १०:३५ ते १४ मार्च रोजी दुपारी १२:२३ पर्यंत असणार आहे. त्यामुळे होळी दोन वेगवेगळ्या दिवशी साजरी केली जाईल. छोटी होळी (होलिका दहन) गुरुवारी (दि. १३) आणि शुक्रवारी (दि. १४) धुलंडी किंवा रंग खेळला जाणार आहे.

होळीशी संबंधित विधी पौराणिक कथांमध्ये खोलवर रुजलेले आहेत. धुलंडी किंवा रंग होळीच्या आदल्या रात्री, लोक होलिका दहनासाठी एकत्र जमतात, अग्नी पेटवतात. त्याच्या भोवती फेऱ्या मारतात. प्रदेशाप्रमाणे नावे आणि परंपरा वेगवेगळ्या आहेत.

काय आहे आख्यायिका?

आख्यायिका सांगते की, राक्षस राजा हिरण्यकशिपूने भगवान विष्णूचा भक्त असलेला त्याचा मुलगा प्रल्हादला कसा मारण्याचा प्रयत्न केला. हिरण्यकशिपूची बहीण होलिका हिला आगीपासून वाचण्याचा वरदान मिळाला होता. त्यामुळे अग्नित ती जीवंत राहत असे. त्यामुळे तिने प्रल्हादाला तिच्यासोबत अग्नीत बसवण्याचे हिरण्यकशिपूला सुचवले. हिरण्यकशिपूने त्याप्रमाणे केले. तथापि, भगवान विष्णूने हस्तक्षेप केला आणि होलिका आगीत जाळली गेली तर प्रल्हाद वाचला. या घटनेचे स्मरण करण्यासाठी, लोक लाकडे गोळा करतात, अग्नी पेटवतात आणि वाईटावर चांगल्याचा विजय दर्शविणारी प्रार्थना करताना धान्य आणि नारळ अर्पण करतात.

धुलंडी किंवा रंग होळी

दुसऱ्या दिवशी रंग, संगीत आणि पुरणपोळी, गुजिया, मालपुआ आणि थंडाई सारख्या पारंपारिक पदार्थांसह होळी आनंदाने साजरी केली जाते. सहभागी एकमेकांना गुलाल उधळतात आणि पिचकारी वापरून पाणी शिंपडतात, ज्यामुळे मित्र, कुटुंब आणि अगदी अनोळखी लोकांमध्ये सौहार्द वाढतो.

भारतातील वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये होळीचा उत्सव वेगवेगळा असतो. महाराष्ट्रात होळीनंतर पाचव्या दिवशी रंगपंचमीला रंग खेळण्याची पद्धत आहे. एक उल्लेखनीय प्रकार म्हणजे उत्तर भारतातील बरसाना येथील लठमार होळी म्हणून ओळखले जाते. ज्यामध्ये महिला खेळकरपणे पुरुषांना काठ्यांनी मारतात. नांदगावमध्ये लठमार होळी देखील साजरी केली जाते, तर वृंदावन फुलों वाली होळीसाठी प्रसिद्ध आहे, ज्यामध्ये फुलांचा खेळ असतो. पंजाबमध्ये, होला मोहल्ला नावाचा एक अनोखा उत्सव पुरुष आणि महिला दोघेही घोड्यावर बसून रंगांनी खेळतात, ज्यामुळे संपूर्ण भारतातील होळी उत्सवाची विविधता दिसून येते.

logo
marathi.freepressjournal.in