Nag Panchami 2024: ९ की १० ऑगस्ट? कधी आहे नागपंचमी? जाणून घ्या योग्य तारीख आणि पूजेचा शुभ मुहूर्त

Nagpanchami 2024 Shubh Muhurat: नागपंची सणाच्या तारखेबद्दल गोंधळ आहे. तसेच पूजेची योग्य वेळ कोणती हे जाणून घ्या.
Nag Panchami 2024: ९ की १० ऑगस्ट? कधी आहे नागपंचमी? जाणून घ्या योग्य तारीख आणि पूजेचा शुभ मुहूर्त
प्रातिनिधिक संग्रहित फोटो
Published on

Nagpanchami 2024: श्रावण महिना सुरु झाला आहे. या महिन्यात अनेक सण येतात. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या तिथीला नागपंचमी साजरी केली जाते. या दिवशी भगवान शिवाची देवता मानल्या जाणाऱ्या नाग देवतेची प्रत्येक घरात पूजा केली जाते. असे मानले जाते की या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने तुमचे धन वाढते. या दिवशी भगवान शंकराची पूजा केल्याने सर्व संकटांपासून मुक्ती मिळते. यंदा नागपंचमी कधी आहे याबद्दल तारखेचा घोळ आहे. यावर्षी नागपंचमी ९ की १० ऑगस्ट रोजी आहे याबद्दल गोंधळ आहे. नागपंचमीची नेमकी तारीख, शुभ वेळ आणि पूजेची पद्धत जाणून घेऊया.

नक्की कधी आहे नागपंचमी?

कॅलेंडरनुसार यंदा नागपंचमी ९ ऑगस्ट रोजी साजरी केली जाईल. हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पंचमीला साजरा केला जातो. या दिवशी नागदेवतेची पूजा करून रुद्राभिषेक करण्याला विशेष महत्त्व आहे. श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाची पंचमी ८ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १२.३७ पासून सुरू होईल. ९ ऑगस्ट रोजी दुपारी ३.१५ वाजता संपेल. अशा प्रकारे, उदय तिथीनुसार, ९ ऑगस्ट रोजी नागपंचमीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जाईल.

Nag Panchami 2024: ९ की १० ऑगस्ट? कधी आहे नागपंचमी? जाणून घ्या योग्य तारीख आणि पूजेचा शुभ मुहूर्त
Shravan Somvar Wishes: पहिल्या श्रावणी सोमवारच्या प्रियजनांना द्या मंगलमय शुभेच्छा!

काय आहे पूजेचा शुभ मुहूर्त?

नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा तुम्ही दिवसभर केव्हाही करू शकता. तरीही ९ ऑगस्ट रोजी सकाळी ५.४७ ते ८.२७ पर्यंत पूजेसाठी सर्वात शुभ मुहूर्त असेल. दुपारी १२.१३ ते १ वाजेपर्यंतचा काळही पूजेसाठी शुभ आहे. यानंतर प्रदोष कालातही पूजेचा शुभ मुहूर्त संध्याकाळी ६.३३ ते ८.२० पर्यंत असेल.

logo
marathi.freepressjournal.in