मार्च-एप्रिलमध्ये कोणत्या पिकांची लागवड करावी? शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती, होईल मोठा नफा

मार्च आणि एप्रिल या कडक उन्हाळ्याच्या महिन्यात तापमान जास्त प्रमाणात असते. यामुळे अनेक पीक या तापमानात पाण्याच्या कमतरतेमळे असो किंवा उष्णतेच्या तीव्रतेमुळे उगवत नाहीत.
मार्च-एप्रिलमध्ये कोणत्या पिकांची लागवड करावी? शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती, होईल मोठा नफा
फोटो सौ FPJ
Published on

मार्च आणि एप्रिल या कडक उन्हाळ्याच्या महिन्यात तापमान जास्त असते. यामुळे अनेक पीक या तापमानात पाण्याच्या कमतरतेमळे असो किंवा उष्णतेच्या तीव्रतेमुळे उगवत नाहीत. या दोन महिन्यात पुढे दिलेली पाच पिके तुम्ही तुमच्या शेतामध्ये लावू शकता आणि चांगल्या प्रकारचे उत्पन्न घेऊन मोठा नफा कमवू शकता.

वांगे
वांग्याची वाढ होण्यासाठी १३ ते २१ अंश तापमान पुरेसे आहे. रात्रीचे तापमान वांग्याच्या पिकाला फायदेशीर असते त्यामुळे मार्च आणि एप्रिल महिन्यात वांग्याचे पीक घेणे योग्य ठरू शकेल.

फोटो सौ Free Pik

कोथिंबीर
शेतकरी मार्च आणि एप्रिल महिन्यात कोथिंबीरची लागवड करू शकतात. कोथिंबीर २० ते ३० अंश तापमानात वाढते त्यामुळे या महिन्यात कोथिंबीरचे उत्पादन चांगले निघते.

फोटो सौ FPJ

कांदा
१० ते ३२ अंश तापमानात कांदा सहज वाढू शकतो तसेच १५० ते १६० दिवसात कांद्याचे उत्पन्न निघते यामुळे या दोन महिन्यात कांद्याचे पीक लावणे फायदेशीर आहे.

फोटो सौ Free Pik

भेंडी
मार्च एप्रिल महिन्यात भेंडीसाठी पूरक वातावरण असते. त्यामुळे शेतामध्ये भेंडीची लागवड करून भरपूर नफा मिळवू शकता.

फोटो सौ Free Pik

काकडी
शेतकऱ्यांना कमी वेळेत जास्त फायदा मिळवून देणारे पिक म्हणजे काकडी. उन्हाळ्यात काकडीची मागणी जास्त असते. काकडीचे पीक या दोन महिन्यात उत्कृष्ट प्रकारे उगवते व काकडीला मागणी देखील भरपूर प्रमाणात असते. यामुळे मार्च आणि एप्रिल मध्ये काकडीची लागवड फायदेशीर आहे.

फोटो सौ Free Pik

(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे)

logo
marathi.freepressjournal.in