Health Tips: चालणे की पायऱ्या चढणे, वजन कमी करण्यासाठी तुमच्यासाठी कोणता व्यायाम चांगला आहे?

Weight Loss: वजन कमी करण्यासाठी प्रत्येकाला व्यायाम करायचा असतो, पण वेळेअभावी कोणता व्यायाम जास्त फायदेशीर ठरेल जा प्रश्न नेहमीच पडलेला असतो.
Health Tips: चालणे की पायऱ्या चढणे, वजन कमी करण्यासाठी तुमच्यासाठी कोणता व्यायाम चांगला आहे?
freepik

Weight Loss Tricks: कोणाला फिट राहायला आवडत नाही. प्रत्येकालाच आपलं वजन नियंत्रणात असायला हवं असं वाटतं. आजकाल बहुतेक लोक जास्त वजनाच्या समस्येशी झुंजत आहेत. यासाठी अनेक गोष्टी केल्या जातात. वेगवेगळे पद्धतीचा वापर वजन कमी करण्यासाठी केला जातो. प्रत्येकाला आपलं वाढलेले वजन कमी करण्यासाठी व्यायाम करायचा असतो. पण आपल्या बदलेल्या लाइफस्टाइलमध्ये वेळेअभावी नक्की कोणता व्यायाम जास्त फायदेशीर ठरेल हा प्रश्न समोर पडतो. जास्त तामझाम न करता आणि कोणत्याही वेळी करता येईल असा व्यायाम शोधला जातो. चालणे हा एक उत्तम व्यायाम आहे, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. पण तुम्हाला माहित आहे का की पायऱ्या चढणे वजन कमी करण्यासाठी तितकेच प्रभावी आहे. एवढंच नाही तर चालण्यापेक्षाही पायऱ्या चढणे जास्त फायदेशीर ठरू शकते?

मजबूत स्नायू

पायऱ्या चढणे तुमच्या पायाचे स्नायू मजबूत करते. यासोबतच तुमचे ग्लूट्स आणि कोर स्नायू देखील मजबूत करतात. स्नायू बळकट केल्याने बेसल मेटॅबॉलिझम दर वाढतो. यामुळे तुमच्या विश्रांतीच्या वेळीही अधिक कॅलरी बर्न होऊ शकतात.

कॅलरी बर्नमध्ये वाढ

पायऱ्या चढल्याने तुमची हृदय गती वेगाने वाढते. यावेळी सर्वात फास्ट कॅलरी बर्न होत असतात. पायऱ्या चढून तुम्ही कमी वेळात जास्त कॅलरी बर्न करू शकता. एका अभ्यासानुसार, पायऱ्या चढल्यावर एकाच वेळी चालण्यापेक्षा सुमारे ३०% जास्त कॅलरी बर्न होऊ शकतात.

हे जाणून घेणे महत्त्त्वाचे

पण हे लक्षात घ्या की, पायऱ्या चढणे प्रत्येकासाठी योग्य काम असू शकत नाही. कारण गुडघेदुखी किंवा सांधेदुखीची समस्या असलेल्या अनेक लोकांसाठी पायऱ्या चढणे खूप कठीण असते. अशा लोकांसाठी, चालणे वजन कमी करणे हा एक चांगला पर्याय आहे.

अधिक फायदे कसा मिळवायचा?

जर तुम्हाला सहज पायऱ्या चढता येत असतील तर ते उत्तमच आहे. पण जर तुम्ही वेगाने पायऱ्या चढलात तर आणखीन फायदा होईल.याशिवाय तुम्ही एक पायरी स्किप करून दोन पायऱ्या एकत्र चढून व्यायाम अधिक तीव्र करू शकता.

(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. या माहितीची 'नवशक्ति' पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

logo
marathi.freepressjournal.in