केस पांढरे का होतात? पांढरा केस तोडणं योग्य की अयोग्य?

पांढरे केस अथवा काळे कोणतेही केस असो ते कधीच तोडून अथवा ओढून काढू नये कारण त्यामुळे तुमच्या हेअर फॉलिकल्सचे नुकसान होते. असं केल्यामुळे पुढे तुमच्या केसांची वाढ खुंटते
केस पांढरे का होतात? पांढरा केस तोडणं योग्य की अयोग्य?
Published on

केसांना नैसर्गिक रंग प्राप्त करणाऱ्या रंगपेशी कमी झाल्यामुळे केस पिकून पांढरे होतात. मात्र आजकाल ताणतणावामुळेही केसांच्या रंगपेशींवर दुष्परिणाम होताना दिसतो. वयस्कर लोकांचे सर्वच केस पांढरे होतात. मात्र तरूणपणांचे केस कमी प्रमाणात पिकतात. कधी कधी तर एखादा केसच पांढरा झालेला दिसून येतो. अशा वेळी तो पांढरा केस तोडू नये असं सांगण्यात येतं. पूर्वीच्या काळी असं सांगितलं जायचं की, पांढरा केस तोडला तर त्याच्या आजूबाजूचे सर्वच केस पांढरे होतात. त्यामुळे घाबरून माणसं पांढरे केस तोडत नसत, मात्र हे सत्य नाही. पांढरे केस अथवा काळे कोणतेही केस असो ते कधीच तोडून अथवा ओढून काढू नये कारण त्यामुळे तुमच्या हेअर फॉलिकल्सचे नुकसान होते. असं केल्यामुळे पुढे तुमच्या केसांची वाढ खुंटते

केसांची कशी राखावी निगा

जर तरूणपणीच तुमचे काही केस पांढरे झाले असतील तर जास्त चिंता करू नका. कारण चिंता केल्यामुळे तुमचे केस अधिक पांढरे होतील. केस पिकण्यामागचं कारण ताणतणाव असण्याची शक्यता आहे. अशा वेळी पांढरे केस लपवण्यासाठी ते डाय करण्याचाही विचार करू नका. कारण त्यामुळे तुमच्या केसांचे अधिक नुकसान होईल. त्यापेक्षा अशा वेळी आहारात पोषकमुल्ये वाढतील,ताणतणावावर नियंत्रण ठेवता येईल, शांत झोप घेता येईल या गोष्टींकडे जास्त लक्ष द्या. कारण यामुळे तुमचे केस पांढरे होणं थांबेल आणि केसांचे आरोग्य सुधारेल. 

केसांसाठी आयुर्वेदिक उपाय

केसांसाठी आयुर्वेदाचा वापर करताना काही ठराविक घटकांचा तुम्ही नक्कीच वापर करायला हवा. त्यामुळे तुमचे केस सुंदर होण्यास मदत मिळेल. केसांसाठी काही घटक हे कमालीचे काम करतात. या आयुर्वेदिक घटकापासून तुम्ही  केसांसाठी आयुर्वेदिक तेल बनवू शकता. असा वापर केल्यामुळे तुमचे केस चांगले होण्यास तुम्हाला मदत मिळेल.

आवळा

आरोग्य आणि सौंदर्यासाठी आवळा हे फळ फारच फायद्याचे मानले जाते. व्हिटॅमिन C ने युक्त असलेल्या अशा फळामध्ये अनेक असे पोषक घटक असतात ज्यामुळे त्वचा, केस चांगले राहण्यास मदत मिळते. केसांच्या वाढीसाठी आवळा हा एक उत्तम घटक आहे.

असा करा वापर
आवळा पावडर आणून तिचा उपयोग केसांसाठी केला जातो.आवळा पावडर भिजवून त्यामध्ये लिंबाचा रस, थोडेसे दही घालून एक दाटसर पॅक तयार करा. तो केसांना लावा. चांला वाळला की, मग तो एखाद्या माईल्ड शॅम्पूने धुवून टाका. जर तुमच्याकडे ताजे आवळे असतील तर तुम्ही त्याचा रस काढा. तो स्प्रे बॉटलमध्ये घालून केसांच्या मुळांना स्प्रे करा. त्यामुळे केसांना वाढ मिळण्यास मदत मिळते.

logo
marathi.freepressjournal.in