फ्रिज ऐवजी माठातील पाणी पिण्याचे काय आहेत फायदे? आरोग्यासाठी किती चांगले?

उन्हाळ्यात शरीर सातत्याने डिहायड्रेट होत असते. त्यामुळे शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी आपण सातत्याने पाणी पितो. मात्र, त्यातही थंड पाणी पिण्यासाठी फ्रिजचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र, फ्रिजमधील थंड पाण्याच्या तुलनेत माठातील गार पाणी पिणे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर असते, असे डॉक्टर्स सांगतात.
फ्रिज ऐवजी माठातील पाणी पिण्याचे काय आहेत फायदे? आरोग्यासाठी किती चांगले?
Freepik
Published on

उन्हाळ्यात शरीर सातत्याने डिहायड्रेट होत असते. त्यामुळे शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी आपण सातत्याने पाणी पितो. मात्र, त्यातही थंड पाणी पिण्यासाठी फ्रिजचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र, फ्रिजमधील थंड पाण्याच्या तुलनेत माठातील गार पाणी पिणे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर असते, असे डॉक्टर्स सांगतात. तसेच आपल्या घरातील जाणती मंडळीही माठातील पाणी पिण्यासाठी आग्रह धरतात. चला जाणून घेऊया माठातील पाणी पिण्याचे काय फायदे आहेत.

मातीतील आवश्यक खनिजे मिळतात

माठ हा मातीने तयार केला जात असल्याने मातीतील अनेक वेगवेगळी खनिजे माठातील पाण्यात मिसळतात. त्यामुळे हे पाणी आपल्या शरीरातील आवश्यक ती खनिजांची उणीव भरून काढते.

नैसर्गिकरित्या थंड आणि शुद्ध

माठातील पाण्याचे तापमान नैसर्गिकरित्या कमी राहते, ज्यामुळे ते उन्हाळ्यात शरीराला ताजेतवाने ठेवते. माठ घडवताना त्याची रचना अशी केली जाते की त्यातील पाणी नैसर्गिकरित्या गार होईल. त्यामुळे ते आरोग्यासाठी अधिक चांगले असते.

पचनक्रिया सुधारते

माठातील पाणी हे फ्रिजच्या पाण्याच्या तुलनेत पचनासाठी अधिक हलके असते. त्यामुळे माठातील पाणी पिण्याचे पचनक्रिया सुधारण्यासाठी अनेक फायदे होतात.

त्वचा चमकदार होते

माठातील पाण्यामुळे शरीराला आवश्यक ती खनिजे मिळतात. पचनक्रिया सुधारते त्यामुळे पोट साफ होते. परिणामी त्वचा चमकदार बनते आणि पिंपल्सचा त्रासही होत नाही.

मानसिक शांतता

माठातील पाणी पिल्याने मानसिक शांतता मिळते. तणाव हलका होतो.

घशाचे आरोग्य चांगले ठेवते

फ्रिजमधील पाण्यामुळे अनेकवेळा घसा बसणे, घसा दुखणे यांसारखे त्रास होतात. मात्र, माठातील पाणी पिल्यामुळे घशाचे आरोग्य चांगले राहते.

(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

logo
marathi.freepressjournal.in