Pregnancy Care Tips: निरोगी मातृत्वासाठी गरोदर महिलांच्या वैद्यकीय तपासणी करणे का महत्त्वाचे आहे? तज्ज्ञांकडून जाणून घ्या!

Women Health: गरोदरपणाच्या अगदी सुरुवातीच्या दिवसांपासून प्रत्यक्षात बाळ कुशीत येईपर्यंत, प्रत्येक महिलेचे गरोदरपण वेगळे असते.
Pregnancy Care Tips: निरोगी मातृत्वासाठी गरोदर महिलांच्या वैद्यकीय तपासणी करणे का महत्त्वाचे आहे? तज्ज्ञांकडून जाणून घ्या!
PM

Healthy Motherhood: आईच्या गर्भात वाढणारे बाळ ही जीवनातील सर्वात मोठी जादू आहे. बहुतांश महिलांसाठी गरोदरपणाचा काळ उत्सुकतेबरोबरीनेच चिंता देखील वाढवणारा असतो. बाळ ठीक आहे ना, आपली तब्येत नीट राहील ना असे नाना प्रश्न भेडसावत असतात. गरोदरपणाच्या अगदी सुरुवातीच्या दिवसांपासून प्रत्यक्षात बाळ कुशीत येईपर्यंत, प्रत्येक महिलेचे गरोदरपण वेगळे असते. गरोदरपणातील तपासण्या अधिकाधिक प्रगत होत आहेत. एखाद्या समस्येची संभाव्यता ओळखणाऱ्या स्क्रीनिंग टेस्ट्स आणि गर्भामध्ये एखादा आजार/विकृती आहे हे अचूकपणे ओळखणाऱ्या डायग्नोस्टिक टेस्ट्स असे या तपासण्यांचे प्रमुख प्रकार आहेत. काहीवेळा स्क्रीनिंग टेस्ट्सनंतर डायग्नोस्टिक टेस्ट करावी लागू शकते. याबद्दल अधिक जाणून घेऊयात डॉ हॅलोईस स्टॅनले, लॅबोरेटरी हेड, मेट्रोपॉलिस हेल्थकेयर लिमिटेड (श्री गंगानगर, राजस्थान) यांच्याकडून...

महिला गर्भवती आहे याची खात्री पटल्यानंतर स्त्रीरोगतज्ञांना भेटून तपशीलवार क्लिनिकल परीक्षण करणे तसेच हिमोग्लोबिन, रक्तातील शर्करेचे व टीएसएचचे प्रमाण यासारखे आरोग्य निकष तपासून घेणे, एखाद्या आजाराची संभाव्यता ओळखू शकतील अशा काही तपासण्या, जसे की, रक्तगट, व्हायरल मार्कर्स, लघवीची तपासणी, व्हीडीआरएल आणि हिमोग्लोबिन इत्यादी करून घेणे आवश्यक आहे.

रक्ततपासणी गरजेची

पहिल्या १२ आठवड्यांमध्ये जवळपास सर्व गर्भवती महिलांची रक्ततपासणी केली जाते. गर्भामध्ये डाउन्स, एडवर्ड आणि पटाऊ सिंड्रोम यासारखे जेनेटिक आजार आहेत का हे तपासले जाते. यावेळी रेडिओलॉजीवर आधारित तपासणी देखील केली जाते. या तपासण्या केल्या नसतील तर १४ ते २२ आठवड्यांमध्ये क्वाड्रुपल मार्कर स्क्रीनिंग केले पाहिजे. विज्ञानातील प्रगतीमुळे आता नॉन-इन्व्हेसिव्ह प्रीनेटल स्क्रीनिंग टेस्ट (एनआयपीटी) उपलब्ध आहे. ही तपासणी ११ ते १७ आठवड्यांमध्ये केली जाऊ शकते. ही तपासणी करून जेनेटिक आजार लक्षात येऊ शकतात. (डिटेक्शन रेट >९५% संवेदनशीलता आणि विशिष्टता)

काही केसेसमध्ये जर बाळामध्ये काही विकृती असल्याचा संशय येत असेल तर त्याची खात्री करून घेण्यासाठी १४ ते १८ आठवड्यांमध्ये कोरीओनिक व्हीलस/ऍम्नीऑटिक फ्लुइडवर इन्व्हेसिव्ह टेस्ट म्हणजे कॅरिओटाइपिंग, फिश आणि क्रोमोसोमल मायक्रोएरमार्फत तपासणी केली जाते.

या गोष्टी लक्षात घ्या

गर्भवती महिलेचे आरोग्य व्यवस्थित राहावे याकडे देखील लक्ष दिले गेले पाहिजे कारण बाळाचे आरोग्य, प्रसूती सुखरूपपणे पार पडणे या गोष्टी आईच्या आरोग्यावर अवलंबून असतात. खूप जास्त उच्च रक्तदाब किंवा शर्करा पातळी योग्य नसेल तर अवधी पूर्ण होण्याआधी प्रसूती होणे किंवा इतर गुंतागुंत होऊ शकते. पहिल्या तीन महिन्यांमध्ये प्री-एकलम्प्सियासाठी प्लॅसेंटल ग्रोथ फॅक्टर टेस्ट केली जाते. गर्भावस्थेमध्ये कधीही जर शर्करेचे प्रमाण कमीजास्त होत असेल तर २४ ते २८ आठवड्यांमध्ये ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट करून जेस्टेशनल डायबिटीस मेलिटस आहे अथवा नाही याची खात्री करून घेता येते.

गरोदरपणाची सुरुवात होण्यापासून ते बाळ जन्माला येईपर्यंतच्या नऊ महिन्यांच्या काळात या सर्व तपासण्या करून घेऊन आई व बाळाचे आरोग्य सुरक्षित राखता येते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in