
सब्जा हे सर्वांच्याच परिचयाचे आहे. अनेक सरबतच्या गाड्यांवर हे सब्जा दिसून येते. सब्जा पाण्यात टाकून ते पाणी पितात. हे आरोग्यासाठी खूपच उत्तम असते. काळसर सुके पाण्यात टाकले की फुगून पांढरे आणि गुळगुळीत होते. हे पाणी त्वचेसाठी फारच उत्तम असते शिवाय याचे अनेक फायदे होतात.
फायबरमुळे वजन नियंत्रणात
सब्जा मधील फायबरमुळे वजन नियंत्रणात राहते. त्यामुळे अनेक जण आपल्या डाएटमध्ये सब्जाचा समावेश करतात. रोज सकाळी एक ग्लास सब्जा बिया घातलेले पाणी प्यायल्याने वजन कमी करण्यास मदत होते. सब्जा पाणीमुळे माणसाला खूप जास्त वेळ भूक लागत नाही. पोट भरलेले राहते. त्यामुळे सातत्याने खाण्याची क्षमता कमी होते.
उष्णतेपासून त्वरित आराम
सब्जा बिया या चवीला गोड असतात. तसेच हे थंड गुणाचे आहे. त्यामुळे याचे सेवन केल्याने कडक उन्हाळ्यातही शरीराला आराम मिळतो.
मधुमेहाच्या रुग्णांसाठी उत्तम
सब्जा बियांमध्ये असलेले फायबर कार्बोहायड्रेट्सचे शोषण कमी करते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित होण्यास मदत होते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्ण डॉक्टरांच्या सल्ल्याने आवश्यक त्या प्रमाणात सब्जा बी चे सेवन करू शकतात.
हृदयाचे आरोग्य
ओमेगा-३ फॅटी अॅसिडने समृद्ध असलेले सब्जा बियाणे जळजळ कमी करून आणि लिपिड प्रोफाइल सुधारून हृदयाच्या आरोग्यास प्रोत्साहन देते.
त्वचेचे आरोग्य
सब्जा बियांमधील अँटीऑक्सिडंट्स ऑक्सिडेटिव्ह तणावाचा सामना करण्यास आणि निरोगी, चमकदार त्वचेला प्रोत्साहन देण्यास मदत करू शकतात. याच्या नियमित सेवनाने त्वचा चमकदार दिसते.
हाडांचे आरोग्य
सब्जाच्या बियांमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस असतात, जे मजबूत आणि निरोगी हाडे राखण्यासाठी आवश्यक खनिजे आहेत. त्यामुळे याचे नियमित सेवन केल्याने सांधे दुखी, अंगदुखी, गुडघे दुखी, पायाचे आरोग्य चांगले राहते.
हार्मोन संतुलन
महिलांना हार्मोन संतुलन बिघडण्याच्या समस्या या अनेक वेळा होत असतात. सब्जा बिया हार्मोन्सचे नियमन करण्यास आणि PCOS किंवा मासिक पाळीच्या अनियमिततेसारख्या हार्मोनल असंतुलनाशी संबंधित लक्षणे कमी करण्यास मदत करू शकतात.
पाण्याशिवाय या पदार्थांमध्ये घेऊ शकतात
तसेच तर सब्जाच्या बिया या शक्यतो पाण्यात घालून त्याचे सेवन करतात. मात्र, या व्यतिरिक्त या बिया, फालुदा, मिल्क शेक, लिंबू पाणी, सरबत, दही इत्यादींमध्येही घेऊ शकतात.
(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)