शिवजयंतीच्यानिमित्ताने प्रियजनांना द्या शुभेच्छा; पाहा सुंदर मेसेज

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दरवर्षी आज (१९ फेब्रुवारी) रोजी देशभरात साजरी केली जाते.
शिवजयंतीच्यानिमित्ताने प्रियजनांना द्या शुभेच्छा; पाहा सुंदर मेसेज

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दरवर्षी आज (१९ फेब्रुवारी) रोजी देशभरात साजरी केली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श जपणारे आणि महाराजांवर खूप प्रेम करणारे लोक या दिवशी उत्सव साजरा करतात. ढोल ताशाच्या गजरात महाराजांची मिरवणूक देखील काढतात. महाराजांच्या गड किल्ल्यांवर जाऊन कोणी स्वच्छता करतात तर कोणी आनंद उत्सव साजरा करतात. व्हॉट्सअॅप मेसेज किंवा स्टेटसवर एकमेकांना शुभेच्छा देतात.आज आपण या दिवशी दिल्या जाणाऱ्या हटके शुभेच्छांच्या मेसेजची लिस्टबद्दल जाणून घेणार आहोत. हे मेसेज पाठवून तुम्ही एकमेकांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देऊ शकता.

-जिजाऊच्या पोटी बाळ शिवबा जन्माला

शिवनेरी किल्ल्यावार माझा भगवा फडकला

नाही जगात दुसरा कोणी माझ्या छत्रपती वाणी

नाही होणार दुसरा कोणी माझ्या छत्रपती वाणी

शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

-किती राजे आले आणि किती राजे गेले

पण तुमच्या सारखे कोणी नाही…

छत्रपती शिवाजी महाराज की जय

शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा

एक मराठा लाख मराठा

शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा

-खंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत व स्फूर्ती स्थान

श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा

सर्व शिवभक्ताना शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा!!!

नाही जातीपातीत अडकला माझा दैवत होता उदार..

अठरा बगड जाती हाताशी दिले मावला नाव शूर-वीर

शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा!

-आम्ही त्यांच्या पुढे होतो नतमस्तक

ज्यांच्यामुळे आज आहे आमचं अस्तित्व

सर्व शिवभक्तांना छत्रपती शिवाजी महाराज<br>यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!

इतिहासाच्या पानावर, रयते च्या मनावर,

मातिच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर,

राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपतींना मानाचा मुजरा,

सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!!!

-माझ्या राजाला दगडाच्या मंदिराची गरज नाही,

माझ्या राजाला रोज पुजाव लागत नाही,

माझ्या राजाला दुध-तुपाचा अभिषेक करावा लागत नाही,

माझ्या राजाला कधी नवस बोलावा लागत नाही,

माझ्या राजाला सोने-चांदीचा साज ही चढवावा लागत नाही,

एवढ असुनही जे जगातील अब्जवधी लोकांच्या

हृदयावर अधिराज्य गाजवतात असे एकमेव युगपुरुष..

‘छत्रपती शिवाजी महाराज’

-महाराजांनी आम्हाला घडवलं,

जगण्यास बळ दिलं..

तुम्ही होता म्हणून आम्ही आहोत..

असंख्य लोकांमध्ये आम्हाला अस्तित्व दिलं..

शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा

-किती राजे आले आणि किती राजे गेले

पण तुमच्या सारखे कोणी नाही…

छत्रपती शिवाजी महाराज की जय

शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in