पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या हार्ट अटॅकची लक्षणे वेगळी? कसे ओळखाल?

हार्ट अटॅकमुळे मृत्यु पावणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये ३० वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या नागरिकांमध्ये हार्ट अटॅकचा धोका वाढत आहे. पुरुष असो वा महिला, सर्वांनाच हार्ट अटॅकचा धोका असतो. परंतु, अभ्यासातून असे दिसून आले आहे की, पुरुषांपेक्षा महिलांना हार्ट अटॅकचा धोका जास्त असतो.
पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या हार्ट अटॅकची लक्षणे वेगळी? कसे ओळखाल?
पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या हार्ट अटॅकची लक्षणे वेगळी? कसे ओळखाल?Photo- Yandex
Published on

हार्ट अटॅकमुळे मृत्यु पावणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये ३० वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या नागरिकांमध्ये हार्ट अटॅकचा धोका वाढत आहे. पुरुष असो वा महिला, सर्वांनाच हार्ट अटॅकचा धोका असतो. परंतु, अभ्यासातून असे दिसून आले आहे की, पुरुषांपेक्षा महिलांना हार्ट अटॅकचा धोका जास्त असतो. पण तुम्हाला माहिती आहे का, पुरुष आणि महिलांमध्ये हार्ट अटॅकची लक्षणे वेगवेगळी असतात, ही लक्षणे कोणती जाणून घेऊयात.

महिलांमध्ये हार्ट अटॅकची कोणती लक्षणे दिसतात?

छातीत दुखणे - पुरुषांमध्ये हार्ट अटॅकचे सर्वात सामान्य लक्षण म्हणजे छातीत तीव्र वेदना होणे. परंतु, महिलांना छातीत जडपणा किंवा जळजळ जाणवू शकते, ज्याला अनेकदा गॅस किंवा अपचन समजले जाते.

मान, जबडा, खांदा किंवा पाठदुखी - हार्ट अटॅकमध्ये महिलांना छातीऐवजी मान, जबडा, खांदा किंवा पाठीच्या वरच्या भागात वेदना जाणवू शकतात. ही वेदना हळूहळू वाढू शकते किंवा अचानक तीव्र होऊ शकते.

श्वास घेण्यास त्रास होणे - कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय श्वास घेण्यास त्रास होणे हे हार्ट अटॅकचे लक्षण असू शकते.

एक किंवा दोन्ही हातांना वेदना- पुरुषांप्रमाणे, महिलांनाही हार्ट अटॅकच्या वेळी डाव्या हातात वेदना जाणवू शकतात. परंतु, कधी-कधी उजव्या हाताला किंवा दोन्ही हातांना देखील वेदना जाणवू शकतात.

मळमळ, उलट्या किंवा अपचन - महिलांमध्ये हार्ट अटॅक येण्याआधी मळमळ, उलट्या होणे, छातीत जळजळ किंवा अपचन यांसारख्या समस्या जाणवू शकतात.

घाम येणे - कोणत्याही शारीरिक हालचालीशिवाय अचानक घाम येणे हे हार्ट अटॅकचे लक्षण असू शकते.

चक्कर येणे - अचानक चक्कर येणे, अशक्तपणा जाणवणे किंवा बेशुद्ध पडणे हे देखील हार्ट अटॅकचे लक्षण आहे. याकडे अजिबात दुर्लक्ष करु नका.

थकवा जाणवणे - हार्ट अटॅक येण्याआधी अनेक महिलांना थकवा जाणवतो. हा थकवा इतका तीव्र असू शकतो की त्यामुळे सामान्य कामे करणे देखील कठीण होऊ शकते.

पुरुषांमध्ये कोणती लक्षणे दिसतात?

पुरुषांमध्ये हार्ट अटॅक येण्याआधी छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे आणि हात, जबडा, मान किंवा पाठीत वेदना होणे ही सामान्य लक्षणे दिसतात. जर शरीरात अशी कोणतीही लक्षणे दिसत असतील तर याकडे दुर्लक्ष न करता त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.

(Disclaimer: या लेखात दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. नवशक्ति’ यातून कोणताही दावा करत नाही.)

logo
marathi.freepressjournal.in