World Asthma Day 2024: दम्याचा आजार आहे? रुग्णांसाठी अनुकूल घरगुती वातावरण तयार करण्यासाठी फॉलो करा टिप्स!

Health Care: दरवर्षी, जागतिक दमा दिवस मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी जगभरात साजरा केला जातो. यंदा हा दिवस ७ मे रोजी साजरा होणार आहे.
World Asthma Day 2024: दम्याचा आजार आहे? रुग्णांसाठी अनुकूल घरगुती वातावरण तयार करण्यासाठी फॉलो करा टिप्स!
Freepik

Tips for Prevention Of Asthma : जागतिक अस्थमा दिन दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी जगभरात साजरा केला जातो, या वेळी ७ मे रोजी आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या अहवालानुसार, २०१९ मध्ये जगभरात दम्यामुळे सुमारे ४.५ लाख लोकांचा मृत्यू झाला. यामुळे या आजराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. या आजारासाठी घरगुती योग्य वातावरण तयार केल्यास रुग्णाला फायदा होईल. "अस्थमासाठी अनुकूल घरगुती वातावरण तयार करणे महत्त्वाचे आहे. प्रथम आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, घरातील हवेची गुणवत्ता राखणे. धूळ, घाण आणि पाळीव प्राण्यांचे केस यांसारख्या गोष्टी घरात असू नये." असं डॉ (प्रमुख) राजेश भारद्वाज- ENT विशेषज्ञ (वसंत विहार, प्रॅक्टोवर सल्लामसलत) सांगतात. डॉक्टरांकडून सविस्तरपणे माहिती जाणून घेऊयात.

या टिप्स फॉलो करा

हवेच्या गुणवत्तेसोबतच दम्याच्या आजार असलेल्यांनी सामान्य ट्रिगर्सचा संपर्क कमी करणे देखील आवश्यक आहे. याचा अर्थ धूळ आणि इतर गोष्टींपासून मुक्त होण्यासाठी नियमित साफसफाई करणे. तसेच अ‍ॅलर्जी दूर करण्यासाठी गरम पाण्यात बेडिंग आणि पडदे धुणे गरजेचे आहे. ज्यांच्या घरी केसाळ पाळीव प्राणी आहे त्यांनी त्याला बेडरुमच्या बाहेर ठेवणे गरजेचं आहे. याशिवाय नियमितपणे त्यांची देखभाल केल्याने पाळीव प्राण्यांच्या केसातील कोंडा कमी होण्यास मदत होऊ शकते. ओलसर वातावरणात दमा वाढतो. दम्यासाठी अनुकूल घरामध्ये आर्द्रता पातळी नियंत्रित करणे देखील महत्त्वाचे आहे.यासाठी तुम्ही चांगल्या डिह्युमिडिफायरमध्ये गुंतवणूक करा.

बाथरूममध्ये डिह्युमिडिफायर वापरणे आणि घरातील आर्द्रता ३०-५०% च्या दरम्यान राखणे गरजेचे आहे. बुरशीचा प्रसार रोखण्यास आणि श्वासोच्छवास सुरळीत राखण्यास मदत होऊ शकते. याशिवाय, सुगंध मुक्त आणि हायपोअलर्जेनिक साफसफाईची उत्पादने निवडल्याने दम्याचा झटका येऊ शकणाऱ्या त्रासदायक घटकांचा संपर्क कमी होऊ शकतो.

चांगली झोप महत्त्वाची

अनेक अस्थमा रुग्णांना झोपे येत नाही. त्यांना आजरामुळे रात्रीची विश्रांती घेणे आणखी कठीण होते. यासाठी तुम्ही ब्लॅकआउट पडदे, थंड जागा आणि अ‍ॅलर्जींपासून मुक्त असलेली बेडरुम तयार करा.झोपेच्या वेळेच्या जवळपास कॅफिन आणि जड जेवण टाळणे. झोपेच्या २-३ तासांच्या आत हेवी व्यायाम करणे टाळणेही आवश्यक आहे.

logo
marathi.freepressjournal.in