World Digestive Health Day: तुम्ही चमच्याने जेवतात? हाताने जेवण्याचे फायदे एकदा वाचाच

Benefits of Eating with Hands: आजकाल चमच्याने जेवणाचा ट्रेंड आहे. पण आयुर्वेदानुसार हाताने अन्न खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते.
 Reasons why eating with hands
Freepik

Advantages of eating with hands:आपल्या भारतीय संस्कृतीनुसार हाताने अन्न खाल्ले जाते. पण आजकाल आपण प्रत्येक गोष्टीत पाश्चिमात्य पद्धत फॉलो करत आहोत. याचमुळे आता जेवताना हाताने नाही तर चमच्याने अन्न खाल्ले जाते. पण हे लक्षात घेणे गरजेचे आहे की हाताने खाणे ही केवळ एक परंपरा नाही तर या परंपरेमुळे आरोग्यासाठी अनेक फायदे होतात. आयुर्वेदानेही हे मान्य केले आहे. अनेक लोकांनी आता चमच्याने जेवायला सुरुवात केली असली तरी जेव्हा जेव्हा हाताने खाण्याची संधी मिळेल तेव्हा ही संधी सोडू नकात. दीक्षा भावसार सावलिया या आयुर्वेदिक डॉक्टरांनी हाताने अन्न खाण्याचे काय फायदे आहेत हे त्यांनी आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. चला जाणून घेऊयात हाताने जेवल्यास काय फायदे मिळतात.

मिळतात 'हे' फायदे

> आयुर्वेदानुसार हाताने अन्न खाल्ल्याने पचनक्रिया चांगली राहते. यामुळे पोटाशी संबंधित अनेक समस्या दूर होतात.

> आयुर्वेदानुसार, हाताची पाच बोटे आकाश (अंगठा), वायु (तर्जनी), अग्नी (मधली बोट), पाणी (रिंग बोट), पृथ्वी (करंगळी) दर्शवतात. हाताने खाल्ल्याने शरीरातील या पाच घटकांचे संतुलन राखून शरीराला ऊर्जाही मिळते.

> याशिवाय जेव्हा आपण आपल्या हातांनी अन्नाला स्पर्श करतो तेव्हा मेंदूला एक सिग्नल पाठवला जातो की आपण खाण्यासाठी तयार आहोत, ज्यामुळे मेंदू आवश्यक पाचक एन्झाइम्स सोडतो, जे अन्न सहज पचण्यास मदत करतात.

> हाताने खाताना आपण किती खावे, काय खावे आणि कोणत्या वेगाने खावे हे समजू शकतो, ज्यामुळे पचनाचे काम सोपे होण्यास मदत होते.

> पचनसंस्था निरोगी ठेवायची असेल, तर चमचा सोडून हाताने खाण्याची सवय लावा, पण हाताने खाताना एका गोष्टीची विशेष काळजी घ्या. जेवण्यापूर्वी आणि नंतर हात साबणाने धुवावे लागतात.

(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. या माहितीची 'नवशक्ति' पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

logo
marathi.freepressjournal.in