World Environment Day: जागतिक पर्यावरण दिनानिमीत्त ठेवा 'हे' मराठमोळे शुभेच्छा कोट्स!

World Environment Day 2024 Wishes: दरवर्षी ५ जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. याच निमित्ताने तुम्ही सोशल मीडियावर शुभेच्छा स्टेटस ठेवू शकता.
World Environment Day: जागतिक पर्यावरण दिनानिमीत्त ठेवा 'हे' मराठमोळे शुभेच्छा कोट्स!
Freepik

World Environment Day 2024 Status, Quotes: दरवर्षी जगभरात ५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस पर्यावरणाच्या धोक्यांबद्दल लोकांना जागृत करण्याच्या उद्देशाने आणि त्यामुळे होणारे नुकसान कसे टाळता येईल या उद्देशाने साजरा केला जातो. आपल्या मुलांसाठी आणि भावी पिढ्यांसाठी एक चांगले आणि सुरक्षित वातावरण सुनिश्चित करण्याच्या दिशेने पर्यावरणाला वाचवणे फार गरजेचे आहे. आजच्या या खास जागतिक पर्यावरण दिनानिमीत्त तुम्ही नेचर लव्हर्सला शुभेच्छा संदेश पाठवू शकता किंवा सोशल मीडियावर या खास दिनाचे मराठमोळे शुभेच्छा (World Environment Day 2024 Wishes, Status, Images, Quotes, Messages & Greetings) स्टेटस ठेवू शकता.

१९७२ मध्ये, संयुक्त राष्ट्र महासभेने स्टॉकहोम परिषदेत मानवी पर्यावरणावर ५ जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करण्याचा ठराव मंजूर केला. त्यानंतर दरवर्षी हा दिवस जगभरात साजरा केला जाऊ लागला.

बघा हे शुभेच्छा कोट्स

> पृथ्वीला, निसर्गाला तुमच्यासारखेच जगू द्या

तिच्यामुळे आपण जिवंत आहोत एवढं भान असू द्या

जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा!!

> पर्यावरण दिनाचा दिवस खास

निसर्ग रक्षणाचा घेऊन ध्यास

तुम्हा साऱ्यांच्या सहकार्याची आस

पृथ्वीला घेऊ देऊ श्वास

Happy World Environment Day

> पृथ्वीचे संवर्धन करू

पर्यावरणाला जपत भविष्य घडवू

जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा!

> निर्सगाच्या देणगीचा सन्मान करूया

पर्यावरणाचे संवर्धन करूया

जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा!

> निसर्ग जगला तर मानव जगेल

हे तुम्हाला पटत असेल तर आज पासून

No plastic हे ध्येय ठेवू पर्यावरणाला वाचवू

पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा!!

(शुभेच्छा संदेश क्रेडिट: सोशल मीडिया)

logo
marathi.freepressjournal.in