World Health Day 2025 : जागतिक आरोग्य दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास, महत्त्व आणि थीम

निरोगी आयुष्य जगणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. मात्र, आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्या अति वेगवान जीवनशैलीमुळे आरोग्याकडेच नेमके दुर्लक्ष होते. आरोग्य जपणे आपल्या हातात आहे याची जाणीव करून देण्यासाठी दरवर्षी ७ एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन (World Health Day 2025) साजरा केला जातो. जाणून घ्या याचा इतिहास महत्त्व आणि २०२५ ची थीम काय आहे?
World Health Day 2025 : जागतिक आरोग्य दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास, महत्त्व आणि थीम
Freepik
Published on

निरोगी आयुष्य जगणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. मात्र, आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्या अति वेगवान जीवनशैलीमुळे आरोग्याकडेच नेमके दुर्लक्ष होते. त्यामुळेच प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. आरोग्याशी संबंधित समस्यांबाबत, स्वतःच्या उत्तम फिटनेसबाबत, मानसिक आरोग्याबाबत जागरुकता वाढावी, यासाठीच जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो. दरवर्षी ७ एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन (World Health Day 2025) साजरा केला जातो. जाणून घ्या याचा इतिहास महत्त्व आणि २०२५ ची थीम काय आहे?

आरोग्यम् धनसंपदा (World Health Day 2025)

आरोग्य हेच खरे धन आहे, मोठी संपत्ती आहे, असे आपल्या संस्कृतीतही सांगितले आहे. मात्र, आपण नेमके वारंवार हेच विसरून जातो. अनेक वेळा आजारांकडे कानाडोळा करतो. त्यामुळे डॉक्टर, आरोग्य कर्मचारी यांच्यासह हा दिवस प्रत्येकाने साजरा करायला हवा.

जागतिक आरोग्य दिन कधी आणि का सुरू करण्यात आला ?(World Health Day 2025)

दुसऱ्या महायुद्धानंतर अनेक देश रोग, कुपोषण आणि आरोग्य सेवांच्या अभावाशी झुंजत होते. अशा परिस्थितीत, सर्व देशांसाठी आरोग्य धोरणे बनवू शकेल अशा जागतिक संघटनेची आवश्यकता भासू लागली. त्यातूनच जागतिक आरोग्य संघटनेच्या स्थापनेचा विचार पुढे आला. ७ एप्रिल १९४८ रोजी WHO ची स्थापना झाली आणि दरवर्षी हा संस्मरणीय दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा करण्याची परंपरा १९५० पासून सुरू झाली. त्यामुळे आज ७ एप्रिल हा केवळ जागतिक आरोग्य दिन नसून जागतिक आरोग्य संघटनेचा स्थापना दिवस देखील आहे.

जागतिक आरोग्य दिनाचा उद्देश (World Health Day 2025)

आरोग्य ही केवळ डॉक्टर आणि रुग्णालयांची जबाबदारी नाही तर आपले आरोग्य जपणे ही आपली स्वतःची प्राथमिकता असायला हवी. तसेच केवळ जागतिक आरोग्य दिन केवळ औपचारिकता म्हणून नाही तर लोकांना उत्तम दिनचर्या, मानसिक स्थिती आणि चांगली जीवनशैली यांची आठवण करून देण्यासाठी साजरा केला जातो.

काय आहेत जागतिक आरोग्य दिनाचे उद्दीष्ट? (World Health Day 2025)

सर्वसामान्यांना आरोग्याविषयी जागरूक करणे

आरोग्य सेवांच्या मुद्द्यांवर सार्वजनिक संवाद सुरू करणे

आरोग्यसेवा सुधारण्यासाठी सरकारांना प्रेरित करणे

नवीन पिढीला "निरोगी जीवनशैली" साठी प्रेरित करणे

निरोगी सुरुवात आणि आशादायक भविष्य, जागतिक आरोग्य दिन 2025 ची थीम

निरोगी सुरुवात आणि आशादायक भविष्य ही जागतिक आरोग्य दिन २०२५ ची थीम आहे. या थीममागे माता आणि नवजात बालकांच्या आरोग्याचा विचार करण्यात आला आहे. माता आणि नवजात शिशूचे मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रयत्न करणे, गर्भधारणेपासून बाळंतपण आणि त्यानंतर ही काही काळ या दरम्यान चांगल्या सेवा पुरवठांची आवश्यकता अधोरेखित करणे, हा यंदाचा उद्देश आहे.

ही थीम अतिशय महत्त्वाची आहे. कारण जगभरात माता आणि नवजात शिशूंचे मृत्यूदर चिंताजनक होत आहे. त्यामुळे माता आणि शिशू दोघांच्या आरोग्याविषयी अधिकाधिक जागरुकता वाढवणे हा या वर्षीच्या जागतिक आरोग्य दिनाच्या थीम मागील उद्देश आहे.

logo
marathi.freepressjournal.in