World Laughter Day 2024: हसत राहा! हसल्याने आरोग्याला होतात अनेक फायदे

Health Benefits of Laughing: दरवर्षी ५ मे रोजी हसण्याचे फायदे आणि महत्त्व सांगण्यासाठी जागतिक हास्य दिन साजरा केला जातो.
Freepik
Freepik
Published on

Mental Health Benefits of Laughing: सगळ्यांनाच आपण निरोगी असायला हवं असं वाटतं. निरोगी राहण्यासाठी प्रयत्न केले जाते. निरोगी राहण्यासाठी सकस आहार आणि व्यायाम करण्याबद्दल नेहमीच बोललं जाते. पण यासोबतच तणावमुक्त राहणेही फार महत्त्वाचं आहे. तणावामुळे अनेक आजारांचा धोका अनेक पटींनी वाढतो. तणाव कमी करण्याचे अनेक मार्ग आहेत. यातलाच एक सोपा मार्ग म्हणजे लाफ्टर थेरपीसारख्या टेक्निक्सची मदत घेणे. हसणे शाररिक आणि मानसिक आरोग्यासाठी खूप चांगले असते. यामुळेच, लोकांना हसण्याचे फायदे आणि महत्त्व याबद्दल जागरूक करण्यासाठी, जागतिक हास्य दिन दरवर्षी ५ मे रोजी साजरा केला जातो. हसणे तुमच्यासाठी कसे फायदेशीर ठरू शकते हे जाणून घेऊयात.

रक्त प्रवाह वाढवते

जेव्हा आपण स्ट्रेसमध्ये असतो तेव्हा कधीकधी रक्त आपल्या मेंदूपर्यंत योग्यरित्या पोहोचत नाही. रक्त नीट पोहचत नाही त्यामुळे रक्तदाब देखील कमी होतो. हसण्यामुळे रक्त प्रवाह आणि ऑक्सिजन वाढते. हसण्यामुळे मानसिक आरोग्य सुधारते, तणाव आणि चिंता कमी होते. हसल्याने रक्तदाब कमी होण्यास मदत होते आणि हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो.

निद्रानाश बरा होऊ शकतो

हसल्याने झोपेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते. होय, जर तुम्हाला झोपेचा त्रास किंवा निद्रानाश असेल तर आवर्जून रोज मनापासून हसा. कारण निद्रानाशाचा थेट संबंध तणावाशी आहे. जेव्हा जेव्हा एखाद्या व्यक्तीवर ताण येतो तेव्हा तो भूक गमावतो किंवा झोप गमावतो. जे हसण्याने कमी करता येते.

शरीरासाठी होते नैसर्गिक कसरत

हसणे मूड सुधारण्यास आणि आनंदाची भावना वाढविण्यात मदत करू शकते. हसण्यामुळे चेहऱ्याच्या, पोटाच्या आणि डायाफ्रामच्या स्नायूंना नैसर्गिक कसरत मिळते, ज्यामुळे तणाव कमी होतो आणि पचन सुधारते.

(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. या माहितीची 'नवशक्ति' पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

logo
marathi.freepressjournal.in