Air Pollution and Lung Cancer: वाढत्या प्रदूषणामुळे अनेक आजार (Health Care) होत आहे. वायू प्रदूषणामुळे फुफ्फुसे गंभीर आजार होतात. फुफ्फुसे आजारी पडू लागली आहेत. यामुळे फुफ्फुसात साचलेली घाण काढून टाकणे खूप गरजेचे आहे. तुमचं फुफ्फुस डिटॉक्स करणे गरजेचे आहे. हे डिटॉक्स करणे फुफ्फुस आणि यकृत निरोगी ठेवण्यास मदत करते. प्रदूषणामुळे आपल्या फुफ्फुसांवर मोठा परिणाम होत आहे. वाढत्या वायू प्रदूषणात राहिल्याने आपल्या फुफ्फुसांवर जितका परिणाम होतो तितकाच सिगारेट ओढल्याने होतो. जे लोक धूम्रपान करतात त्यांना जास्त फटका सहन करावा लागतो. यासाठी तुम्ही डिटॉक्स वॉटर वापरू शकता जे तुमचे फुफ्फुस आणि यकृत दोन्ही स्वच्छ करण्यास मदत करेल.
शरीर पूर्णपणे डिटॉक्स होईल
डॉ. प्रियंका त्रिवेदी यांनी इंस्टाग्रामवर एक रेसिपी शेअर केली आहे, ज्याद्वारे तुम्ही तुमचे फुफ्फुस आणि यकृत डिटॉक्स करू शकता. यासाठी तुम्हाला रात्री एक पेय तयार करून सकाळी प्यावे लागेल. हे पेय तुम्हाला २० ते २५ दिवस सतत प्यावे लागते. याने तुमचे शरीर पूर्णपणे डिटॉक्स होईल.
डिटॉक्स पेय कसे बनवायचे?
सर्वप्रथम १ लिटर स्वच्छ पाणी घ्या आणि ते एका काचेच्या बाटलीत घ्या. आता १ लिंबाचे छोटे आणि पातळ तुकडे करून त्यात घाला. कारल्याचे पातळ तुकडे करून त्याच पाण्यात टाका. यासोबतच धुवून १०-१५ पुदिन्याची पाने घाला. साधारण १ इंच आले सोलून त्याचे तुकडे करून त्यात घाला. आता हे पाणी फ्रीजमध्ये किंवा बाहेर रात्रभर ठेवा. सकाळी सामान्य तापमानात आल्यानंतर त्यातील अर्धा भाग प्या. हे पाणी तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी प्यावे. यानंतर, अर्धा तास काहीही खाऊ किंवा पिऊ नका.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या आकडेवारीनुसार, २०२० मध्ये फुफ्फुसाच्या कर्करोगामुळे १८ लाख लोकांनी आपला जीव या आजारामुळे गमावला. आपल्या देशाबद्दल बोलायचे झाल्यास एकूण कर्करोगाच्या रुग्णांपैकी फुफ्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण सुमारे ६% आहे, तर एकूण ८% लोक या आजरामुळे आपला जीव गमावतात.