World Skin Health Day 2024: त्वचेसाठी बदाम आहेत गुणकारी, जाणून घ्या फायदे!

Almond for Skin: बदामांच्‍या पौष्टिकतेसह त्‍वचेला आतून पोषण द्या
World Skin Health Day 2024: त्वचेसाठी बदाम आहेत गुणकारी, जाणून घ्या फायदे!
Published on

त्‍वचेचे आरोग्‍य उत्तम राखण्‍यासाठी फक्‍त त्वचेची बाहेरून काळजी घेणे पुरेसे नाही, यासाठी त्‍वचेला आतून पोषण मिळणे देखील आवश्‍यक आहे. आपण सेवन करणाऱ्या आहाराचा त्‍वचेवर आणि एकूण आरोग्‍यावर परिणाम होतो. म्‍हणून, बदामांसारख्‍या पौष्टिक पदार्थांचा समावेश करत आहार आरोग्‍यदायी व संतुलित असणे महत्त्वाचे आहे. १५ आवश्‍यक पौष्टिक घटक असलेले बदाम त्‍वचेसाठी गुणकारी ठरू शकतात, काळासह त्‍वचेचा पोत व टोन सुधारू शकतात. आपल्‍या दैनंदिन नित्‍यक्रमामध्‍ये मूठभर बदामांचे सेवन केल्‍याने अनेक फायदे मिळू शकतात, जसे त्‍वचेची चमक व कोमलता वाढू शकते. दरवर्षी ८ जुलै रोजी वर्ल्‍ड स्किन हेल्‍थ डे साजरा केला जातो, तर मग यंदा या दिनानिमित्त बाहेरील स्किनकेअरसोबत त्‍वचेला आतून पोषण देण्‍यावर लक्ष केंद्रित करूया.

आहारामध्‍ये बदामांचा समावेश केल्‍यास त्‍वचेवरील सुरकुत्‍या कमी होण्‍यास मोठ्या प्रमाणात मदत होऊ शकते. आरोग्‍यदायी फॅट्स व व्हिटॅमिन ई (अल्‍फा-टोकोफेरॉल) संपन्‍न प्रमाणात असलेले बदाम त्‍यांच्‍या अॅण्‍टी-एजिंग गुणधर्मांसाठी ओळखले जातात, ज्‍यामुळे त्‍वचेचे आरोग्‍य उत्तम राहते. नियमितपणे बदामांचे सेवन केल्‍याने त्‍वचेचे सूर्यप्रकाशात गेल्‍याने नुकसान होण्‍यास कारणीभूत असलेले प्राथमिक स्रोत यूव्‍हीबी किरणांपासून देखील संरक्षण होऊ शकते, तसेच त्‍वचेचा पोत व टोन देखील सुधारू शकते. याव्‍यतिरिक्‍त, बदाम आयुर्वेद, सिद्ध व युनानी अशा विविध पारंपारिक औषध ग्रंथांमध्‍ये त्‍यांच्‍या त्‍वचेसंबंधित फायद्यांसाठी ओळखले जातात. बदामांमध्‍ये त्‍वचेची चमक व कोमलता वाढवण्‍याची क्षमता आहे. हे पॉवरहाऊस नट्स वैविध्‍यपूर्ण देखील आहेत. बदाम विविध स्‍वरूपात सेवन करता येऊ शकतात, ज्‍यामुळे कोणत्‍याही आहारामध्‍ये पौष्टिकतेची भर करतात.

स्किन एक्‍स्‍पर्ट व कॉस्‍मेटोलॉजिस्‍ट गीतिका मित्तल गुप्‍ता म्‍हणाल्‍या, ''वर्ल्‍ड स्किन हेल्‍थ डे निमित्त आपल्‍या शरीराची प्रमुख संरक्षक असलेल्या त्‍वचेच्‍या महत्त्वाच्‍या भूमिकेला महत्त्व देऊया. पुरेशी झोप, आरोग्‍यदायी आहाराचे सेवन, सूर्यप्रकाशापासून संरक्षण करणाऱ्या वस्‍तूंचा वापर आणि सक्रिय राहणे अशा सोप्‍या सवयींमुळे त्‍वचेचे आरोग्‍य उत्तम राहण्‍यास मदत होऊ शकते. माझा दृढ विश्‍वास आहे की प्रथिने, आरोग्‍यदायी फॅट्स व व्हिटॅमिन्‍सने संपन्‍न संतुलित आहाराचे सेवन त्‍वचेचे आरोग्‍य उत्तम राखण्‍यासाठी आवश्‍यक आहे. तुमच्‍या दैनंदिन आहारामध्‍ये बदामांचा समावेश करा, बदामांमध्‍ये प्रथिने, व्हिटिॅमिन ई, झिंक व कॉपर यासारखे पौष्टिक घटक असतात, जे त्‍वचेचे आरोग्‍य उत्तम ठेवतात. खरेतर, दररोज बदाम सेवन केल्‍याने त्‍वचेचे यूव्‍हीबी किरणांपासून संरक्षण होऊ शकते आणि त्‍वचेची पोत देखील सुधारू शकते.''

बॉलिवुड अभिनेत्री सोहा अली खान म्‍हणाल्‍या, ''अभिनेत्री असल्‍यामुळे मी त्‍वचेचे आरोग्‍य उत्तम राखण्‍याला अधिक प्राधान्‍य देते. यासाठी, मी संतुलित व आरोग्‍यदायी आहाराचे सेवन करते आणि बाहेरील पदार्थ खाणे देखील टाळते. मी आरोग्‍यदायी स्‍नॅकिंगला प्राधान्‍य देते, जसे मी कुठेही गेल्‍यास सोबत बदामांनी भरलेला डबा घेऊन जाते. बदामांचे सेवन केल्‍याने मी दीर्घकाळापर्यंत भूक लागत नाही, अनारोग्‍यकारक, रेडी-टू-इट फूड्स सेवन करण्‍यापासून दूर राहते, ज्‍यामुळे माझी त्‍वचा व आरोग्‍य उत्तम राहण्‍यास मदत होते.''

एमबीबीएस व न्‍यूट्रिशनिस्‍ट डॉ. रोहिनी पाटील म्‍हणाल्‍या, ''वर्ल्‍ड स्किन हेल्‍थ डे बहुमूल्‍य आठवण करून देते की, आपल्‍या त्‍वचेमधून एकूण आरोग्‍य दिसून येते आणि आपल्‍या आहारविषयक निवडी यामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावतात. मी बदामांसारख्‍या फूड्सचा आहारामध्‍ये समावेश करण्‍याची शिफारस करते. बदामांमध्‍ये अॅण्‍टीऑक्सिडण्‍ट्स, व्हिटॅमिन्‍स व आरोग्‍यदायी फॅट्स मोठ्या प्रमाणात असतात, जे त्‍वचेची कोमलता व आरोग्‍य उत्तम राखतात. आवश्‍यक पौष्टिक घटक असलेले बदाम दैनंदिन आहारामध्‍ये समाविष्‍ट केल्‍यास अनेक आरोग्‍यदायी फायदे देतात, जसे रक्‍तातील शर्करेच्‍या प्रमाण व कोलेस्‍ट्रॉल पातळ्यांवर नियंत्रण ठेवतात आणि वजन नियंत्रणात ठेवण्‍यास मदत करतात.''

नवी दिल्‍लीमधील मॅक्‍स हेल्‍थकेअर येथील डायटेटिक्‍सच्‍या प्रादेशिक प्रमुख रितिका समाद्दार म्‍हणाल्‍या, ''पोषण एकूण आरोग्‍य उत्तम राहण्‍यासाठी आवश्‍यक आहे आणि त्‍वचेचे आरोग्‍य उत्तम राखण्‍यामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावते. आहारतज्ञ म्‍हणून मी माझ्या क्‍लायण्‍ट्सना त्‍यांच्‍या आहारविषयक निवडींबाबत दक्ष राहण्‍याचा आणि आहारामध्‍ये बदामांसारखे त्‍वचेला अनुकूल फूड्सचा समावेश करण्‍याचा सल्‍ला देते. व्हिटॅमिन ई व आरोग्‍यदायी फॅट्स असलेले हे पौष्टिक-संपन्‍न नट्स त्‍वचेचे आरोग्‍य उत्तम राखण्‍यास मदत करतात. तसेच, बदाम उत्तम आरोग्‍यदायी स्‍नॅक आहेत, ज्‍यामुळे त्‍वचा व एकूण आरोग्‍यासाठी अनारोग्‍यकारक असलेले जंक फूडचे सेवन टाळण्‍यास मदत होते.''

फिटनेस मास्‍टर पिलेट्स इन्‍स्‍ट्रक्‍टर यास्‍मीन कराचीवाला म्‍हणाल्‍या, ''आरोग्‍यदायी त्‍वचेसाठी दोन घटक महत्त्वाचे आहेत: आरोग्‍यदायी आहार सेवन करण्‍याच्‍या सवयी आणि सक्रिय राहणे. तुमच्‍या दैनंदिन आहारामध्‍ये बदाम, हंगामी फळे, भाज्‍या व संपूर्ण धान्‍य यांसारख्‍या नैसर्गिक फूड्सचा समावेश करा. हे पौष्टिक-संपन्‍न फूड्स आवश्‍यक व्हिटॅमिन्‍स व मिनरल्‍स देतात, जे त्‍वचेला आतून पोषण देतात. तसेच, सक्रिय जीवनशैली आणि नियमित व्‍यायाम त्‍वचेचे आरोग्‍य व एकूण आरोग्‍य उत्तम राखण्‍यसाठी महत्त्वाचे आहे.''

आयुर्वेद एक्‍स्‍पर्ट मधुमिता क्रिष्‍णन म्‍हणाल्‍या, ''कृत्रिम व क्विक-फिक्‍स स्किन ट्रीटमेंट्सचे प्रभुत्‍व असलेल्‍या युगामध्‍ये यंदा वर्ल्‍ड स्किन हेल्‍थ डे नैसर्गिक उपायांच्‍या क्षमतेला प्रकाशझोतात आणतो आणि आयुर्वेदच्‍या प्राचीन ज्ञानाला प्राधान्‍य देतो. आयुर्वेदने नेहमी अंतर्गत आरोग्‍य आणि बाह्य सौंदर्यामधील महत्त्वाच्‍या दुव्‍यावर भर दिला आहे, ज्‍यामधून आरोग्‍यदायी आहाराचे महत्त्व दिसून येते. आहारामध्‍ये फळे, भाज्‍या आणि बदामांसारख्‍या नट्सचा समावेश करणे एकूण आरोग्‍यासह त्‍वचेचे आरोग्‍य उत्तम राखण्‍यासाठी आवश्‍यक आहे. प्रकाशित झालेल्‍या आयुर्वेद, सिद्ध व युनानी ग्रंथांनुसार, बदाम त्‍वचेचे आरोग्‍य व त्‍वचेची चमक वाढवण्‍याच्‍या त्‍यांच्‍या क्षमतेसाठी ओळखले गेले आहेत.''

लोकप्रिय साऊथ इंडियन अभिनेत्री प्रणिता सुभाष म्‍हणाल्‍या, ''व्‍यस्‍त शूटिंग शेड्यूलदरम्‍यान माझ्या त्‍वचेचे आरोग्‍य उत्तम राखण्‍यासाठी मी आरोग्‍यदायी व संतुलित आहाराचे सेवन करते, पुरेशी झोप घेते आणि नियमितपणे व्‍यायाम करते. मी त्‍वचेचे व एकूण आरोग्‍य उत्तम ठेवण्‍यासाठी आहारामध्‍ये हंगामी फळे, भाज्‍या आणि बदामांसारख्‍या नट्सचा समावेश करते. बदाम हे माझे गो-टू स्‍नॅक आहेत, कारण बदामांमध्‍ये अॅण्‍टीऑक्सिडण्‍ट्स, डाएटरी फायबर व प्रथिने संपन्‍न प्रमाणात असतात, ज्‍यामुळे मला दीर्घकाळापर्यंत भूक लागत नाही आणि त्‍वचा व आरोग्‍यासाठी चांगले नसलेले जंक फूडचे सेवन टाळण्‍यास मदत होते.''

साऊथ इंडियन अभिनेत्री वानी भोजन म्हणाल्‍या, ''कलाकार म्‍हणून आम्‍हाला आमच्‍या व्‍यस्‍त शेड्यूल्‍समध्‍ये अधिक वेळ सूर्यप्रकाशात राहावे लागते, ज्‍यामुळे यूव्‍हीबी किरणांचा आमच्‍या त्‍वचेवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. म्‍हणून, मी नियमितपणे स्किनकेअर रूटिनचे पालन करते आणि सनस्क्रिनचा वापर करते. मी आरोग्‍यदायी व संतुलित आहाराचे सेवन देखील करते. माझ्या आहारामध्‍ये बदामांचा समावेश असतो, कारण बदामांमध्‍ये त्‍वचेची चमक वाढण्‍यासाठी आवश्‍यक असलेले अॅण्‍टीऑक्सिडण्‍ट्स आणि व्हिटॅमिन ई असते. खरेतर, दररोज बदामांचे सेवन केल्‍याने माझ्या त्‍वचेचे यूव्‍हीबी किरणांपासून संरक्षण होते आणि त्‍वचेची पोत देखील सुधारते. म्‍हणून, मी बदामांचे सेवन करण्‍याची खात्री घेण्‍यासोबत स्‍मूदीज व सलाड्समध्‍ये बदामांचा समावेश करते, ज्‍यामुळे माझ्या त्‍वचेला अतिरिक्‍त पोषण मिळते.''

यंदा वर्ल्‍ड स्किन हेल्‍थ डे निमित्त बदामांच्‍या आरोग्‍यदायी फायद्यांबाबत जाणून घ्‍या आणि या पॉवरहाऊस नट्सना दैनंदिन नित्‍यक्रमामध्‍ये समाविष्‍ट करत काळासह त्‍यांच्‍या परिवर्तनात्‍मक परिणामांचा अनुभव घ्‍या. बदाम वैविध्‍यपूर्ण व आरोग्‍यदायी आहेत, तसेच कोणत्‍याही स्‍वरूपात चालता-फिरता सेवन करता येतात. म्‍हणून, तुम्‍ही कधीही बदामांच्‍या फायद्यांचा आनंद घेऊ शकता.

logo
marathi.freepressjournal.in