पोटापासून ते गुडघ्यापर्यंतचा शरीराचा भाग अतिरिक्त जाड आहे? झोपण्याची पद्धत बदला, स्लीम फिगर मिळेल!

आपल्या प्रत्येकालाच छान आकर्षक स्लीम आणि सगळीकडून समांतर फिगर हवे असते. मात्र, हे प्रत्येकालाच मिळते, असे नाही. अनेकांना वजन वाढल्याची समस्या असते. तर अनेक जणांना फक्त पोटापासून ते गुडघ्यापर्यंतच्या भागावर अतिरिक्त चरबी जमते. तुम्हाला मनासारखे स्लीम फिगर मिळत नसेल तर तुम्हाला तुमच्या झोपण्याच्या पद्धतीवर विचार करावा लागेल. जाणून घ्या सविस्तर...
पोटापासून ते गुडघ्यापर्यंतचा शरीराचा भाग अतिरिक्त जाड आहे? झोपण्याची पद्धत बदला, स्लीम फिगर मिळेल!
Freepik
Published on

आपल्या प्रत्येकालाच छान आकर्षक स्लीम आणि सगळीकडून समांतर फिगर हवे असते. मात्र, हे प्रत्येकालाच मिळते, असे नाही. अनेकांना वजन वाढल्याची समस्या असते. तर अनेक जणांना फक्त पोटापासून ते गुडघ्यापर्यंतच्या भागावर अतिरिक्त चरबी जमते. त्यामुळे या लोकांचा पोटापासून ते गुडघ्यापर्यंतचा भाग अतिरिक्त जाड असतो. तर त्यासाठी डाएट पाळणे, व्यायाम करणे योगासन करणे, जिम जॉईन करणे इत्यादी गोष्टी करतात. एवढे करूनही तुम्हाला मनासारखे स्लीम फिगर मिळत नसेल तर तुम्हाला तुमच्या झोपण्याच्या पद्धतीवर विचार करावा लागेल. जाणून घ्या सविस्तर...

तुम्हाला पोटावर झोपण्याची सवय आहे का?

अनेकांना पोटावर झोपण्याची सवय असते. यामुळे पाठीच्या मणक्याला त्रास होऊन त्यातून मानदुखी कंबरदुखीचा त्रास उद्भवतो. तसेच पोटावर झोपल्याने शरीराचा सर्व भार पोटावर पडतो. परिणामी अन्नाचे पाचन व्यवस्थित होत नाही. अन्नाचे पाचन व्यवस्थित न झाल्याने पोटावर अतिरिक्त चरबी जमा होऊन पोटाचा खालचा भाग वरच्या भागापेक्षा जास्त जाड होतो किंवा जास्त सुटलेला दिसतो.

एक पाय पोटात घेऊन झोपणे

काही जणांना एक पाय पोटात घेऊन झोपण्याची सवय असते. मात्र ही सवय देखील चुकीची आहे. यामुळे कंबरेच्या भागावर चरबी चढण्याची शक्यता असते.

दोन्ही पाय पोटात घेऊन झोपणे

काही जण थंडीच्या त्रासामुळे अंग चोरून दोन्ही पाय पोटात घेऊन झोपतात. मात्र, याचे शरीराच्या फिगरवर विपरित परिणाम होतात. यामुळे नितंबांचा आकार बाकी शरीरापेक्षा जास्त मोठा होता. तसेच मांड्यांवर अतिरिक्त चरबी साचून ते गुडघ्याखालील पायापेक्षा जास्त मोठे दिसतात.

काय आहे झोपण्याची योग्य पद्धत?

योगासनात झोपण्याची योग्य पद्धत सांगतिली आहे. झोपताना समांतर आणि सरळ झोपणे महत्त्वाचे असते. यामुळे शरीराला आपोआप स्ट्रेचिंग मिळते. पाठीचे मणका सरळ राहतो. त्यामुळे कंबरेवर अतिरिक्त चरबी साचत नाही. एकदम सरळ झोपल्यामुळे पोट सुटत नाही. एका खांद्यावर किंवा एका बाजूने झोपतानाही सरळ झोपावे. पाय पोटात घेऊ नये.

कंबरेखाली उशी घ्यावी?

झोपण्याची चुकीची सवय एकदम सुटत नाही. यासाठी सरळ झोपताना तुम्हाला कंबर दुखत असेल तर कंबरेखाली सपाट उशी घ्या. यामुळे तुम्हाला सरळ झोपण्याची सवय लागेल. तसेच पाय दुखत असतील तर पायाखाली उशी घेऊन झोपावे.

(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

logo
marathi.freepressjournal.in