सर्वात स्वस्त फोनमध्ये मिळेल सर्वात महागड्या फोनसारखी डिझाईन; लाँचपूर्वीच दिसली झलक

शाओमीचा एक नवीन स्मार्टफोन रेडमी ए३ बद्दल गेल्या अनेक दिवसांपासून माहिती समोर येत आहे.
सर्वात स्वस्त फोनमध्ये मिळेल सर्वात महागड्या 
फोनसारखी डिझाईन; लाँचपूर्वीच दिसली झलक

शाओमीचा एक नवीन स्मार्टफोन रेडमी ए३ बद्दल गेल्या अनेक दिवसांपासून माहिती समोर येत आहे. तसेच, डिव्हाइस एनबीटीसी आणि टीडीआरए सर्टिफिकेशन्स साइटवर दिसल्यानंतर मार्केटिंग मटेरियलच्या माध्यमातून समोर आला आहे. आशा आहे की फोन लवकरच लाँच होईल. लीक झालेल्या ब्रोशरमधून याच्या डिझाईन आणि प्रमुख स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे. ज्यात ६.७१-इंचाचा ९०हर्ट‌्झ रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले आणि ५०००एमएएचची बॅटरी मिळू शकते. चला जाणून घेऊया या फोनबाबत समोर आलेली नवीन माहिती.

रेडमी ए३ ची डिझाईन (लीक) : एका आफ्रिकन रिटेलरच्या माध्यमातून एक पोस्टर लीक झाला आहे, जो पॅशनेटगिक्स या वेबसाइटनं ऑनलाईन शेयर केला आहे. रेडमी ए२ की तुलनेत याची डिझाईन मोठ्या प्रमाणात बदलली आहे, याच्या मागे मोठा गोलाकार कॅमेरा मॉड्युल असेल. असा कॅमेरा मॉड्युल शाओमी १३ अल्ट्रामध्ये पाहायला मिळाला होता, जो शाओमीचा सर्वात महागडा फोन आहे. आगामी रेडमी ए३ चे तीन ३ कलर व्हेरिएंट येतील, ज्यात काळ्या, निळ्या आणि हिरव्या रंगाचा समावेश आहे.

रेडमी ए३ चे लीक स्पेसिफिकेशन : फोन एचडी+ रिजोल्यूशन (१६००़७२०), ९० हर्ट‌्झ रिफ्रेश रेट, १२० हर्ट‌्झ टच सॅम्पलिंग रेट, ४०० निट्स पीक ब्राइटनेस आणि गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शनसह ६.७१ इंचाच्या एलसीडी स्क्रीनसह येऊ शकतो. यात १०वॉट यूएसबी टाइप सी चार्जिंगसह ५०००एमएएचची बॅटरी मिळू शकते.

लीक झालेल्या मटेरियलनुसार, फोन मीडियाटेक चिपसेटवर चालेल. जोडीला रेडमी ए३ मध्ये ४जीबी एलपीडीडीआर४एक्स रॅम, ४जीबी व्हर्च्युअल मेमरी आणि १२८जीबी ईएमएमसीई ५.१ स्टोरेजसह येण्याची शक्यता आहे. यात स्टोरेज वाढवण्याचा एक ऑप्शन मिळू शकतो. फोन अँड्राॅइड १३ गो वर चालू शकतो.

फोटोग्राफी आणि व्हिडीओग्राफीसाठी यात १३एमपीचा रिअर कॅमेरा आणि ८एमपीचा फ्रंट शूटर मिळू शकतो. फोनमध्ये ३.५ मिमी हेडफोन जॅक, सिंगल-बँड वाय-फाय, ब्लूटूथ ५.०, जीपीएस आणि ड्युअल सिम व्हीओएलटीई देखील असू शकतो. फोनचे वजन १९२ ग्राम असू शकते.

रेडमी ए३ ची संभाव्य किंमत : रेडमी ए२ स्मार्टफोन भारतात तीन मेमरी व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. याच्या बेस मॉडेलमध्ये २जीबी रॅम व ३२जीबी स्टोरेज देण्यात आली आहे ज्याची किंमत ५,९९९ रुपये आहे. त्यामुळे आशा आहे की कंपनी रेडमी ए३ देखील ६०००-७००० रुपयांच्या बजेटमध्ये सादर करू शकते.

रेडमी ए३ च्या लाँचपूर्वीच स्मार्टफोनचं मार्केटिंग मटेरियल समोर आल्यामुळे डिझाईन आणि स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला आहे. यात ९० हर्ट‌्झ रिफ्रेश रेट, ५०००एमएएचची बॅटरी आणि १२८ जीबी स्टोरेज मिळू शकते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in