मनोज रामकृष्णन / मुंबई
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला. यंदा विधानसभेत १० मुस्लिम आमदार असतील. त्यात सहा मुंबई महानगर क्षेत्रातील असून मुंबईतील पाच मुस्लिम आमदारांचा समावेश आहे.
मालाडमधून अस्लम शेख (काँग्रेस), मुंबादेवीतून अमीन पटेल (काँग्रेस), अणुशक्ती नगरमधून सना मलिक (राष्ट्रवादी), मानखुर्द-शिवाजी नगरमधून अबू असीम आझमी (समाजवादी पक्ष), वर्सोवातून हारुन खान (शिवसेना उबाठा), भिवंडी पूर्व येथून रईस शेख (समाजवादी पक्ष), अकोला पश्चिममधून साजिद खान पठाण (काँग्रेस), मालेगाव मध्यमधून मुफ्ती मोहम्मद इस्माईल (एमआयएम), कागलमधून मुश्रीफ हसन (राष्ट्रवादी), सिल्लोडमधून अब्दुल सत्तार (शिंदे गट) यांनी बाजी मारली.
आश्वासन अपूर्ण
ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे संस्थापक-अध्यक्ष शब्बीर अन्सारी म्हणाले की, मुस्लिम उमेदवारांना पुरेसे प्रतिनिधित्व मिळावे यासाठी त्यांनी मल्लिकार्जुन खर्गे, नाना पटोले आणि राष्ट्रवादीचे शरद पवार या नेत्यांची भेट घेतली. पण त्यांनी आश्वासन पूर्ण केले नाही. सोलापूर, नागपूर, पुणे आणि इतर जिल्ह्यांतील काही मतदारसंघ आहेत जेथे यापूर्वी मुस्लिम आमदार निवडून आले आहेत. मात्र या जागांवर मुस्लिमांना उमेदवारी देण्यात आली नव्हती.