सातारामध्ये बंदला १०० टक्के प्रतिसाद ;अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार ठप्प

पाचवड येथील सकल मराठा समाजाकडून आमदार, खासदारांसह व सर्वपक्षीय नेत्यांना आरक्षण मिळेपर्यंत गाव बंदींचा निर्णय घेतला.
सातारामध्ये बंदला १०० टक्के प्रतिसाद ;अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार ठप्प

कराड : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सातारा जिल्ह्यामध्ये पुकारण्यात आलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या सातारा बंदला आज शंभर टक्के प्रतिसाद मिळाला.मराठा आरक्षणाचा मुद्दा मोठ्या प्रमाणावर पेटला असताना सातारा जिल्ह्यातील मराठा बांधवांनी ही बंदची हाक दिली होती.त्याला पूर्ण प्रतिसाद देत सातारकरांनी आपले व्यवहार बंद केले होते.सातारा शहरांमध्ये तुरळक वाहतूक वगळता सर्व जनजीवन अक्षरशः ठप्प झाल्याचे दिसून येत होते.

सातारा शहरातील अत्यावश्यक सेवेमध्ये औषधे, दूध विक्री, फुले, फळभाजी विक्रीचे व्यवसाय सकाळी सुरू होते; मात्र दुपारनंतर हे व्यवहारही बंद ठेवण्यात आले होते.दिवाळी सणाचा हंगाम तोंडावर आला असतानाही मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सर्व जिल्ह्यातील नागरिकांनी एकमताने या बंदला पाठिंबा देत आपला सहभाग नोंदवला. विविध ठिकाणी या आंदोलन काळात एसटी बसेसवर होणारी वाहतूक व मोडतोड लक्षात घेता अनेक बसेसच्या फेऱ्या बंद करण्यात आल्या होत्या. शहरातील पवई नाका परिसरातही जाणवत होता. मंगळवारी सकाळी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी दुचाकी रॅली काढून सातारा शहरातून बंदला प्रतिसाद देण्याचे आवाहन केले. त्यानंतर सकाळी ११ वा.च्या सुमारासही काही मराठी युवती दुचाकी रॅलीत सहभागी झाले होते. दरम्यान या बंदला सोमवारी रात्री जाहीर केल्यामुळे अनेक विद्यालय तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींना समजले नसल्यामुळे मंगळवारी पायपीट करत शाळा कॉलेज बंद असल्यामुळे अनेकांना परत फिरत घर गाठावे लागले. सातारा तालुक्यात सुरू असलेली बस वाहतूक अगदी तुरळक प्रमाणात सुरू होती .तसेच शहरातील रिक्षाव्यवसायिकांनीही या बंदमध्ये सहभाग घेतल्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले.

मराठानगरमध्ये महिलांचे उपोषण

खटाव तालुक्यातील मराठानगर येथे शनिवारपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी महिलांनी साखळी उपोषण सुरू केले आहे. धोंडेवाडीकरांनी इथून पुढे येणाऱ्या निवडणुकांसाठी मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे, तर पाचवड गावात सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदी केली आहे. मराठा समाजाचे आरक्षण मागणीच्या आंदोलनाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ग्रामीण भागामध्ये ही या आंदोलनास सुरुवात झाली आहे. ग्रामीण भागात हे आंदोलन शांततेत सुरू असले, तरी मराठानगर (गुंठेवारी) येथील मराठा समाजातील महिलांनी शनिवारपासून साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. धोंडेवाडी ग्रामस्थांनी आगामी काळात येणाऱ्या निवडणुकीपूर्वी मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही, तर या निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय तसेच गावामध्ये नेत्यांना बंदी घातल्याचे निवेदन प्रशासनाला दिले आहे. पाचवड येथील सकल मराठा समाजाकडून आमदार, खासदारांसह व सर्वपक्षीय नेत्यांना आरक्षण मिळेपर्यंत गाव बंदींचा निर्णय घेतला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in