दहावी, बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल आज

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत जुलै-ऑगस्ट २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी व बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल २३ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.
संग्राहित छायाचित्र
संग्राहित छायाचित्र
Published on

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत जुलै-ऑगस्ट २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी व बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल २३ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना www.mahresult.nic.in व www.mahahsscboard.in या दोन संकेतस्थळांवर निकाल पाहता येणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत दहावीची पुरवणी परीक्षा दिनांक १६ ते ३० जुलै, तर बारावीची परीक्षा १६ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. परीक्षा कालावधीत २६ जुलै रोजी राज्यातील काही जिल्हयांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला होता. त्यामुळे संपूर्ण राज्यात २६ जुलै रोजी असलेल्या बारावीच्या विषयांची परीक्षा ९ ऑगस्ट रोजी व दहावीच्या विषयाची परीक्षा ३१ जुलै रोजी घेण्यात आली.

logo
marathi.freepressjournal.in