दहावीचा निकाल जाहीर; यंदाही मुलींनी मारली बाजी

या परिक्षेत राज्यभरातील 151 विद्यार्थी असे आहेत ज्यांनी पैकीच्या पैकी म्हणजे 100 टक्के मार्क मिळवले आहेत.
दहावीचा निकाल जाहीर; यंदाही मुलींनी मारली बाजी

बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी तसंच पालकांचं लक्ष दहावीच्या निकालाकडे लागून होतं. हे दोन्ही वर्ष विद्यार्थ्यांसाठी निर्णायक मानले जातात. विद्यर्थी तसंच पालकांची प्रतिक्षा आज संपुष्टात आली आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परिक्षेचा निकाल जाहीर झाला असून राज्याचा निकाल 93.83 लागला आहे. सालाबादाप्रमाणे याही वर्षी या परिक्षेत मुलींनी बाजी मारली आहे. यात 92.05 टक्के मुलं वत्तीर्ण झाले असून मुलींची टक्केवारी ही 95.87 टक्के एवढी आहे. या निकालात राज्यातील विभागांमध्ये कोकण विभागाने 98.11 टक्क्यांसह पहिलं स्थान पटकावलं आहे. तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी हा निकाल पत्रकार परिषदेत जाहीर केला आहे.

एकूण 93.83 टक्के लागलेल्या निकालात 43 शाळा अशा आहेत ज्यांचा निकाल हा शून्य टक्के लागला आहे. तर 29.74 टक्के शाळांचा निकाल हा 100 टक्के लागला आहे. या परिक्षेत राज्यभरातील 151 विद्यार्थी असे आहेत ज्यांनी पैकीच्या पैकी म्हणजे 100 टक्के मार्क मिळवले आहेत. यात पुणे विभागातील 5, छत्रपती संभाजीनगर मधील 22, मुंबई विभागातील 6, अमरावती विभागातील 7, कोकण विभागातील 3 तर लातूल विभागातील सर्वाधीक 108 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यावर्षी दहावीच्या परिक्षेला 23 हजार 10 शाळांमधील 15 लाख 79 हजार 374 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. मागील वर्षाच्या तुलनेत ही नोंदणी यंदा घटल्याचं निदर्शनास आलं आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in