राज्य सरकार एअर इंडियाची इमारत ताब्यात घेणार ; आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील ११ महत्वाचे निर्णय

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली
राज्य सरकार एअर इंडियाची इमारत ताब्यात घेणार ; आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील ११ महत्वाचे निर्णय

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. मंत्रालयात पार पडलेल्या या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले निर्णय

  • धनगर समाजाच्या उन्नतीकरिता योजना प्रभावीरित्या राववणार. योजनांचे सनियंत्रण करणार शक्तीपरद्त समिती

  • राज्यातील निर्यातील वेग देणार. राज्य निर्यात प्रोत्साहन धोरण मंजूर. शेतकऱ्यांनाही फायदा. ४२५० कोटी तरतुदीस मान्यता (उद्योग विभाग)

  • मंगरुळपीर तालुक्यातल्या बॅरजेसना मान्यता. या वाशीम जिल्ह्यातील गावांना मोठा फायदा होणार असून२२०० हेक्टरपेक्षा जास्त जमीन सिंचनाखाली येणार आहे.

  • अनुदानित खासगी आयुर्वेद, युनानी महाविद्यालयांतील अध्यापकांची पदे राज्य निवड मंडळामार्फत भरणार

  • मेगावस्त्रोद्योग प्रकल्पांना देखील सामुहिक प्रोत्साहन योजनेचा लाभ मिळणार. राज्याच्या वस्त्रोद्योग धोरणात सुधारणा.

  • गणित विज्ञाना विद्यार्थ्यांना पारंगत करणार. आश्रमशाळांना शिक्षकांची २८२ पदे भरणार

  • विदर्भात ५ ठिकाणी आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्रे उभारणार. संत्रा उत्पादकांना मोठा फायदा होणार

  • बारामती येथे पोलीस श्वान प्रशिक्षण केंद्र उभारणार

  • महाराष्ट्र बोव्हाईन ब्रिडिंग रेग्युलेटरी अथॉरिटी स्थापणार. रेतन केंद्रे रोगमुक्त करणार

  • नरिमन पॉइंट येथील एअर इंडिया इमारत लवकर ताब्यात घेण्यासाठी पाऊले. एअर इंडियाचे सर्व अनर्जित उत्पन्न व दंड माफ

असे महत्वाचे निर्णय आज मंत्रालयात पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in