औरंगजेबाच्या कबरीभोवती १२ फूट उंच पत्र्याचे कुंपण, भिंतीवर काटेरी तारा; नुकसान टाळण्यासाठी केंद्राकडून खबरदारी

नवी दिल्ली : संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादमध्ये असलेल्या औरंगजेबाच्या कबरीचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये, यासाठी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग (एएसआय) जिल्हा प्रशासनाच्या मदतीने खबरदारीचे उपाय करीत असल्याची माहिती केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी राज्यसभेत दिली.
औरंगजेबाची कबर
औरंगजेबाची कबर संग्रहित छायाचित्र
Published on

नवी दिल्ली : संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादमध्ये असलेल्या औरंगजेबाच्या कबरीचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये, यासाठी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग (एएसआय) जिल्हा प्रशासनाच्या मदतीने खबरदारीचे उपाय करीत असल्याची माहिती केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी राज्यसभेत दिली.

प्रश्नोत्तराच्या तासात शेखावत यांनी औरंगजेबाची कबर एएसआयचे एक संरक्षित स्मारक असल्याचे सांगून याचा तपशील एएसआयच्या वेबसाइटवर उपलब्ध असल्याचे नमूद केले. या संरक्षित स्मारकाचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये म्हणून एएसआय सातत्याने जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून पावले उचलत आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

यात मकबऱ्याच्या चारही बाजूला १२ फूट उंच पत्र्याचे कुंपण लावणे, अतिक्रमण करणाऱ्यांना अटकाव व्हावा म्हणून कबरीच्या शेजारील भिंतींवर काटेरी तारा लावणे. मल्टि टास्किंग स्टाफसोबतच खासगी सुरक्षारक्षक तैनात करून याची एएसआय अधिकाऱ्यांमार्फत नियमित निगराणी करणे यासाठी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग प्रयत्न करणार असल्याचे सांगण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in