HSC Exam : ... म्हणून बारावीच्या विद्यार्थ्यांना 'या' पेपरचे मिळणार सहा गुण

चुका मान्य करून विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. बोर्ड विद्यार्थ्यांना 'त्या' तीन प्रश्नांसाठी
HSC Exam : ... म्हणून बारावीच्या विद्यार्थ्यांना 'या' पेपरचे मिळणार सहा गुण

इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. बारावी बोर्डाच्या परीक्षेत बोर्डाकडून इंग्रजीच्या पेपरमध्ये झालेल्या चुकांमुळे विद्यार्थ्यांना सहा गुण मिळणार आहेत. बारावीच्या इंग्रजीच्या पेपरमध्ये काही प्रश्नांमध्ये चुका झाल्या होत्या, त्या प्रश्नांसाठी विद्यार्थ्यांना आता सहा गुण मिळणार आहेत. बारावीच्या इंग्रजीच्या पेपरमध्ये चुका झाल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. त्यानंतर आता बोर्डाने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

21 फेब्रुवारीला 12वीचा इंग्रजीचा पहिला पेपर होता. या इंग्रजी पेपरमध्ये कविता विभागातील प्रश्नांमध्ये चुका होत्या. इंग्रजीच्या पेपरमध्ये तीन प्रश्नांमध्ये चुका होत्या. या तीन प्रश्नांसाठी सहा गुण होते. आता बोर्डाने इंग्रजीच्या पेपरमधील चुका मान्य करून विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. बोर्ड विद्यार्थ्यांना 'त्या' तीन प्रश्नांसाठी एकूण सहा गुण देईल.

बारावीच्या इंग्रजीच्या पेपरमधील तीन चुकीचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना सहा गुण देण्यात येणार असल्याचा निर्णय बोर्डाकडून घेण्यात आला आहे. इंग्रजीच्या पेपरमध्ये चुका आढळून आल्यानंतर बोर्डाने अहवाल देण्यास सांगितले होते. यामध्ये काही तज्ज्ञांची बैठक झाली. बोर्डाने दिलेल्या अहवालात इंग्रजीच्या पेपरमध्ये चुका झाल्याची कबुली बोर्डाने दिली आहे. तीन प्रश्नांमध्ये चुका होत्या.

logo
marathi.freepressjournal.in