शिवशंकर पतसंस्थेत १३ कोटी १० लाखांचा अपहार; १८ संचालकांसह ५ कर्मचाऱ्यांवर गुन्हा

सुमारे १३ कोटी १० लाख रुपयांचा अपहार झाल्याचा प्रकार उघडकीस आल्याने कराड शहरातील शिवशंकर नागरी सहकारी पतसंस्थेच्या १८ संचालकांसह ५ कर्मचाऱ्यांवर कराड शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवशंकर पतसंस्थेत १३ कोटी १० लाखांचा अपहार; १८ संचालकांसह ५ कर्मचाऱ्यांवर गुन्हा

कराड : सुमारे १३ कोटी १० लाख रुपयांचा अपहार झाल्याचा प्रकार उघडकीस आल्याने कराड शहरातील शिवशंकर नागरी सहकारी पतसंस्थेच्या १८ संचालकांसह ५ कर्मचाऱ्यांवर कराड शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विशेष लेखापरीक्षक धनंजय गाडे यांनी फिर्याद दिली आहे.

चेअरमन शरद गौरीहर मुंढेकर, शंकर मनोहर स्वामी, महादेव मल्लाप्पा बसरगी, दीपक मारुती कोरडे, उमेश वसंतराव मुंढेकर, सतीश चंद्रकांत बेडके, मिलिंद रामचंद्र लखापती, मनोज चंद्रकांत दुर्गवडे, वृषाली विश्वास मुंढेकर, सिंधू अमोल जुगे, शंकर नागप्पा घेवारी, सर्जेराव सोमनाथ लोकरे, वसंत कृष्णा काळे, श्रीकांत विठोबा आलेकरी, शिवाजी हणमंतराव पिसाळ, महेश लक्ष्मण शिंदे, प्रेमलता चंद्रकांत बेंद्रे, महालिंग तुकाराम मुंढेकर, तात्यासाहेब आबासाहेब विभुते, शिवाजी भाऊ मानकर, चंद्रकांत गणपती दुर्गवडे आदी संचालकांसह सरव्यवस्थापक रवींद्र मुरगेंद्र स्वामी,कर्मचारी नितीन रामचंद्र चिंचकर (रा. कालवडे), संग्राम शंकर स्वामी (सध्याचे व्यवस्थापक), सुभाष महादेव बेंद्रे (रा. रविवार पेठ, कराड), ज्ञानेश्वरी भिकोबा बारटक्के (रा.रविवार पेठ), दत्तात्रय रघुनाथ शिंदे, (रा. कोडोली) व सुनील आनंदा काशिद (हवेलवाडी-सवादे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. गुन्हा दाखल झालेल्यांपैकी संचालक शिवाजी मानकर, चंद्रकांत दुर्गवडे व व्यवस्थापक रवींद्र स्वामी यांचे निधन झाले आहे.

विशेष लेखा परीक्षक धनंजय गाडे यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शिवशंकर पतसंस्थेत १ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२३ अखेरचे वैधानिक लेखा परिक्षण झाले. त्या अहवालानुसार पतसंस्थेत पतसंस्थेत १३ कोटी १० लाख रुपयांचा अपहार झाल्याचा ठपका आहे. त्यानुसार संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संचालक मंडळाने नियमबाह्य व पदाचा लाभ घेण्याच्या उद्देशाने तब्बल ११ कोटी ५३ लाख १६ हजार ९१५ रूपयांचा अपहार केला आहे. त्यासह ठेव नसताना ठेव तारणाच्या नावाखाली तब्बल १ कोटी ५६ लाख ७९ हजारांचे कर्जही वितरण केले आहे. धनंजय गाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन कराड शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक निरीक्षक कड तपास करीत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in