खाजगी बसला आग लागून १३ जणांचा जळून मृत्यू, आकडा वाढण्याची शक्यता

अपघातग्रस्त बस क्रेनच्या साहाय्याने घटनास्थळावरून हलवण्यात आली. यावेळी एका लहान बाळासह दोन मृतदेह सापडल्याने मृतांची संख्या
खाजगी बसला आग लागून १३ जणांचा जळून मृत्यू, आकडा वाढण्याची शक्यता

औरंगाबाद रोडवर शनिवारी पहाटे डंपर-खासगी बसच्या अपघातात बसला आग लागून १३ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये एका लहान मुलासह आईचाही समावेश आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. अपघातग्रस्त बस क्रेनच्या साहाय्याने घटनास्थळावरून हलवण्यात आली. यावेळी एका लहान बाळासह दोन मृतदेह सापडल्याने मृतांची संख्या 13 वर गेली आहे.

अपघातानंतर डिझेलची टाकी फुटल्याने बसला आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातग्रस्त बस चिंतामणी ट्रॅव्हलची असल्याची प्राथमिक माहिती आहे. ही बस यवतमाळहून मुंबईला जात होती. पहाटे पाचच्या सुमारास पंचवटीतील हॉटेल मिरची चौकात कोळशाने भरलेल्या डंपरने तिला धडक दिली. अपघातानंतर बसने पेट घेतला. बसमध्ये 20 ते 25 प्रवासी असल्याचा अंदाज आहे. त्यातील काही जण उडी मारून पळून गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. अर्धा तास आग विझवण्याचे प्रयत्न सुरू होते. मृत प्रवाशांचे मृतदेह पालिकेच्या सिटीलिंक बसने हलविण्यात आले. आगीत बसचा फक्त सांगाडाच राहिला. बसमधील १३ प्रवाशांचा मृत्यू झाला. या अपघातात 17 प्रवासी जखमी झाले असून त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in