हिंगोलीत १३,५०० महिला कर्करोगग्रस्त? स्थानिक प्रशासनाच्या सर्वेक्षणात धक्कादायक माहिती

हिंगोली जिल्ह्यात १३,५०० महिलांना विविध कर्करोगाची लक्षणे आढळल्याची धक्कादायक माहिती एका सर्वेक्षणात आढळली आहेत.
हिंगोलीत १३,५०० महिला कर्करोगग्रस्त? स्थानिक प्रशासनाच्या सर्वेक्षणात धक्कादायक माहिती
Freepik
Published on

मुंबई : हिंगोली जिल्ह्यात १३,५०० महिलांना विविध कर्करोगाची लक्षणे आढळल्याची धक्कादायक माहिती एका सर्वेक्षणात आढळली आहेत. हे सर्वेक्षण स्थानिक प्रशासनाने केले होते, असे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यात जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी ‘संजीवनी अभियान’ हाती घेतले होते. कर्करोगाची लक्षणे व निदान लवकर होण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला होता.

७ हजार महिलांना ‘सर्व्हायकल’ कर्करोगाची संशयित लक्षणे दिसली, तर ३,५०० महिलांना स्तनांच्या कर्करोगाची, तर २ हजार महिलांना मुख कर्करोगाची लक्षणे आढळली, असे जिल्हाधिकारी गोयल यांनी सांगितले.

तज्ज्ञ डॉक्टरांच्या सहाय्याने व प्रशिक्षित ‘आशा’ कर्मचाऱ्यांच्या मदतीने मराठी भाषेत प्रश्नावली तयार केली होती. यात कर्करोगाच्या विविध लक्षणांची माहिती दिली होती. आशा कार्यकर्त्यांनी जिल्ह्यातील ३.५ लाख महिलांची भेट घेतली. ८ मार्च या महिलापासून ही मोहीम सुरू झाली होती. ३.५ लाख महिलांपैकी १३,५०० जणांना कर्करोगाची लक्षणे आढळली. याबाबत पहिल्या टप्प्यातील चाचण्या झाल्या आहेत. ग्रामीण रुग्णालयात या महिलांच्या आणखी चाचण्या करण्यात येणार आहेत, असे ते म्हणाले.

गोयल म्हणाले की, लातूर जिल्ह्यात जिल्हाधिकारी असताना याबाबतचा प्रायोगिक तत्त्वावर प्रकल्प राबवला होता. त्यात काही रुग्णांमध्ये कर्करोगाची लक्षणे आढळली होती. आजाराचे निदान लवकर व्हावे, याकडे माझे लक्ष्य असते.

logo
marathi.freepressjournal.in