नांदेडच्या शासकीय रुग्णालयात गेल्या २४ तासांत आणखी १४ रुग्णांचा मृत्यू ; चार दिवसांत मृत्यूचा आकडा ५१ वर

नांदेडच्या शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. आर वाकोडे यांच्यासह बालरोग विभागातील डॉक्टरवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नांदेडच्या शासकीय रुग्णालयात गेल्या २४ तासांत आणखी १४ रुग्णांचा मृत्यू ; चार दिवसांत मृत्यूचा आकडा ५१ वर

नांदेडच्या विष्णूपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील मृत्यूचे सत्र काही केल्या केल्या थांबन्याचं नाव घेत नसल्याचं दिसून येत आहे. नांदेड्या शासकीय रुग्णालयात मागील २४ तासात उपचारादरम्यान आणखी १४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे गेल्या चार दिवसात जवळपास ५० हून अधिक रुग्णांनी आपला प्राण गमावला आहे.

2 ऑक्टोबर रोजी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात मृत्यूंचे तांडव सुरु होते. २४ तासांत या रुग्णालयात २४ रुग्णांचा मृत्यू झाला होता. या घटनेने राज्यभरात खळबळ उडाली होती. औषधांचा तुटवडा, परिचारिका, डॉक्टरची रिक्त पदे यामुळे आरोग्य यंत्रणा खिळखिळी झाली होती. यानंतर ३ ऑक्टोबर रोजी या ठिकाणी आणखी ७ रुग्णांचा मृत्यू झाला होता. तर ४ ऑक्टोबर रोजी आणखी ६ जणांनी आपला जीव गमावला होता. आता गुरुवारी ५ ऑक्टोबर रोजी मागील २४ तासात या रुग्णालयात १४ रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकी महाविद्यालय आणि रुग्णालयात आतापर्यंत ५१ रुग्णांनी आपले प्राण गमावले आहेत.

दरम्यान, डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. आर वाकोडे यांच्यासह बालरोग विभागातील डॉक्टरवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in