भरकटलेल्या जहाजावरील १४ खलाशी सुखरूप, अलिबागच्या कुलाबा किल्ला परिसरात मालवाहू जहाज बंद

अलिबागच्या कुलाबा किल्ला परिसरात एक मालवाहू जहाज बंद पडले आहे.
भरकटलेल्या जहाजावरील १४ खलाशी सुखरूप, अलिबागच्या कुलाबा किल्ला परिसरात मालवाहू जहाज बंद
Published on

धनंजय कवठेकर/ अलिबाग :

अलिबागच्या कुलाबा किल्ला परिसरात एक मालवाहू जहाज बंद पडले आहे. सदरचे जहाज हे जेएसडब्ल्यू कंपनीचे आहे. धरमतर बंदरातून २५ जुलै रोजी जयगडकडे तेथे रवाना झाले. मात्र, काही तांत्रिक कारणाने ते भर समुद्रात बंद पडले. कंपनी अन्य जहाज पाठवून त्यातील तांत्रिक बिघाड दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे. मरीन ट्रॅफिक सिस्टमध्ये या जहाजे लोकेशन हे कुलाबा परिसरात असल्याचे दिसून येते. जहाजावर १४ खलाशी असून ते सुखरूप आहेत. त्यांची सुटका करण्यात येणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे समुद्राला देखील चांगलेच उधाण आले आहे. पावसाळ्यात मासेमारी बंद असते, मात्र मोठाल्या मालवाहू जहाजांचा प्रवास सुरू असतो. कुलाबा किल्ला परिसरात एक भले मोठे जहाज थांबल्याचे दिसत आहे. हे जहाज जेएसडब्ल्यूचे असून ते धरमत बंदरातून २५ जुलै रोजी जयगड बंदराकडे कच्चा माल घेऊन (कोळसा) निघाले होते. तांत्रिक कारणाने ते जहाज भरसमुद्रात बंद पडले. समुद्रात इतरत्र भरकटू नये, यासाठी ते नांगरुन ठेवण्यात आले आहे.

यासंबंधी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार हे जहाज जेएसडब्ल्यू कपंनीचे आहे. जहाजात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ते पुढे नेता आले नाही. जहाज भरकटू नये, याठी ते कुलाबा किल्ला परिसरातील भरसमुद्रात नांगर टाकून थांबले आहे.

संबंधीत कंपनीचे अन्य एक जहाज तांत्रिक दुरुस्ती करण्यासाठी रवाना करण्यात येणार आहे. तसेच जहाजावरील सर्व १४ खलाशांना आणण्यात येणार आहे, अशी माहिती अलिबागचे तहसिलदार विक्रम पाटील यांनी दिली.

logo
marathi.freepressjournal.in