ख्रिसमस नवीन वर्षांच्या स्वागतासाठी १४ स्पेशल गाड्या;पनवेल मडगाव दरम्यान धावणार

सुट्टीत प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी पनवेल आणि मडगाव दरम्यान १४ नाताळ, नवीन वर्ष विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.
ख्रिसमस नवीन वर्षांच्या स्वागतासाठी १४ स्पेशल गाड्या;पनवेल मडगाव दरम्यान धावणार

मुंबई : ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची गैरसोय होऊ नये यासाठी मध्य रेल्वेने पनवेल - मडगाव दरम्यान स्पेशल गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.ख्रिसमस व थर्टी फर्स्टला पर्यटक मोठ्या संख्येने गोवा, कोकणात जातात.नाताळ आणि नवीन वर्षाच्या सुट्टीत प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी  पनवेल आणि मडगाव दरम्यान १४ नाताळ, नवीन वर्ष विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.

अशा असतील विशेष गाड्यांच्या फेऱ्या

०१४२७/०१४२८ पनवेल- मडगाव-पनवेल विशेष (१२ फेऱ्या)

 ०१४२७ पनवेल – मडगाव जं, २२ ते ३१ डिसेंबर (६ फेऱ्या) पर्यंत दर शुक्रवार, शनिवार आणि रविवार रोजी ९.१० वाजता विशेष पनवेल येथून सुटेल आणि मडगाव जंक्शन येथे  दुसऱ्या दिवशी ६.५० वाजता पोहोचेल.

 ०१४२८ मडगाव - पनवेल स्पेशल मडगाव जं.

२२  ते ३१ डिसेंबर (६ फेऱ्या) दर शुक्रवारी, शनिवार आणि रविवारी सकाळी ८.०० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी ८.१५ वाजता पनवेल येथे पोहोचेल.

या थांब्यावर थांबतील

रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमाळी.

 संरचना: २२ डब्बे- ६ वातानुकूलित तृतीय, ४ शयनयान, १२ सामान्य द्वितीय श्रेणी गार्ड्स ब्रेक व्हॅनसह.

०१४२९/०१४३० पनवेल- मडगाव-पनवेल नवीन वर्ष विशेष (२ फेऱ्या)

 ०१४३० मडगाव - पनवेल नववर्ष विशेष गाडी मडगाव जं. येथून   ०१ जानेवारी रोजी ९ वाजता (एक फेरी) सुटेल आणि पनवेल येथे दुसऱ्या दिवशी ७.२० वाजता पोहोचेल.

 ०१४२९ पनवेल – मडगाव जं. नवीन वर्ष विशेष पनवेल

२ जानेवारी रोजी ८.२० वाजता सुटेल (एक फेरी) आणि मडगाव जंक्शन येथे  त्याच दिवशी ९.३० वाजता पोहोचेल.

 या थांब्यावर थांबतील

रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमाळी.

 संरचना: २२ डब्बे- ६ वातानुकूलित तृतीय, ४ शयनयान, १२ सामान्य द्वितीय श्रेणी गार्ड्स ब्रेक व्हॅनसह.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in