लाडक्या बहिणींसाठी १४०० कोटींची तरतूद; ३३ हजार ७८८ कोटींच्या पुरवणी मागण्या सादर

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी १४०० कोटी रुपयांच्या तरतुदीसह सरकारने सोमवारी ३३ हजार ७८८ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर केल्या.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
Published on

नागपूर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी १४०० कोटी रुपयांच्या तरतुदीसह सरकारने सोमवारी ३३ हजार ७८८ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर केल्या. मंत्री उदय सामंत यांनी पुरवणी मागण्या सभागृहात सादर केल्या.

लाडकी बहीण योजनेखाली पात्र महिलांना दरमहा १५०० रुपयांचे आर्थिक साह्य देण्यासाठी सरकारने गेल्या अर्थसंकल्पात ४६ हजार कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्याद्वारे २.५ कोटींहून अधिक महिलांना लाभ मिळाला होता. मासिक हप्ता १५०० वरून २१०० रुपये केला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच जाहीर केले होते.त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारण्यासाठी ३६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पात्र सहकारी साखर कारखान्यांसाठी १२०४ कोटी रुपये, मुख्यमंत्री बळीराजा योजनेसाठी ३०५० कोटी रुपये, सार्वजनिक बांधकाम विभागासाठी ७४९० कोटी रुपये; उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागांसाठी ४११२ कोटी रुपये, नगरविकास विभागासाठी २७७४ कोटी रुपये, ग्रामविकास विभागासाठी २००७ कोटी रुपये आणि आदिवासी विकास विभागासाठी १८३० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in